पुणे

टोकावडे आश्रमशाळेत पहिलीपासून संगणक शिक्षण

CD

चास, ता. ५ ः टोकावडे (ता. खेड) येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण दिले जात असून बालवयातच आदिवासी समाजातील मुलांची बोटे संगणकावर फिरत असल्याने मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होत असल्याची माहिती टोकावडे शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पी. बी. चव्हाण यांनी दिली.
विद्यार्थ्यांना केवळ संगणकाची माहिती न देता प्रत्यक्ष संगणक हाताळण्याचा सराव त्यांच्याकडून करून घेतला जातो. इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना संगणक चालू-बंद करणे, माऊस व की-बोर्डचा वापर, अक्षरे व अंक टाइप करणे, चित्र काढणे तसेच विविध शैक्षणिक उपक्रम संगणकावर करणे याचे ज्ञान दिले जाते. तर इयत्ता ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना टायपिंग, एम एस वर्ल्ड, पॅावर पॅाईंट, एक्सेल, ए आय टुल्स, इंटरनेटचा शैक्षणिक वापर, माहिती शोधणे, प्रकल्प व सादरीकरण तयार करणे अशा विविध गोष्टी शिकवल्या जातात. या संगणक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना अभ्यास, प्रकल्प, माहिती संकलन, टायपिंग आणि दैनंदिन डिजिटल कामांमध्ये मोठा उपयोग होत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संगणक हाताळण्याचा आत्मविश्वास तसेच डिजिटल कौशल्ये विकसित होत आहेत. विशेष म्हणजे १ली ते ४थीचे विद्यार्थीही स्वत संगणक हाताळून विविध कृती आत्मविश्वासाने करून दाखवतात. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक पी. बी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शक संगणक शिक्षिका लता दगडे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण दिले जात आहे.
मुख्याध्यापक चव्हाण म्हणाले, ‘‘मुलांचे लक्ष फक्त शिक्षणावर केंद्रित न करता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत निवासाची उत्तम व्यवस्था, शालेय कवायत, स्वच्छता, नियमित आरोग्य तपासणी व जीमची सुविधा आहे. विद्यार्थ्यांना सकाळी ७.३० वाजता नाष्ट्यामध्ये पोहे, उपमा, शिरा, लापशी, पावभाजी वा मिसळ यापैकी एक व अंडे, दुपारी १२.४५ ला जेवण यामध्ये सॅलेड, भाजी, चपाती, वरण, भात, पापड, लोणचे याचा समावेश असतो. सायंकाळी ३.३० वाजता शेंगदाणा चिक्की, राजगिरा लाडू, कचोरी, बर्फी यापैकी एक व एक ग्लास दूध व रात्री ७.३० वाजता जेवण देण्यात येते. यामुळे विद्यार्थी शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकतात.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS: मुंबईत ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2’चे उद्घाटन; देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम’च्या विचारातून जगाला सहकार्याची नवी दिशा

Hartalika Ganesh Chaturthi : यंदा एकाच दिवशी हरतालिका, गणेशोत्‍सव, तब्‍बल २६ वर्षांनंतर आला योग; यावर्षी १२ दिवसांनी उत्सवाची सांगता

Solapur शाळा बांधली, पण पोहोचायचं कसं? वाटच नाही, चिमुरड्यांचे अनोखे आंदोलन

Marathi News Live Updates: आरएसएस बंगालमध्ये स्वत:ची शिक्षण पद्धती का आणतात?, संजय राऊतांचा सवाल

जगाचा नकाशा बदलणार; आफ्रिका दिसणार मोठा, युरोप-अमेरिकेचा आकार होणार कमी, भारताचा ठरावाला पाठिंबा?

SCROLL FOR NEXT