Accident
Accident Sakal
पुणे

Accident : अपघातात संगणक अभियंता युवतीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

ॲपद्वारे रस्ता शोधत दुचाकीवरून जाताना ट्रकने धडक दिल्यामुळे एका संगणक अभियंता युवतीचा मृत्यू झाला.

पुणे - ॲपद्वारे रस्ता शोधत दुचाकीवरून जाताना ट्रकने धडक दिल्यामुळे एका संगणक अभियंता युवतीचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावर घडली.

रिदा इम्तियाज मुकादम (वय २३, रा. खराडी) असे मृत युवतीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार नटराज अनिलकुमार (वय ३०, रा. वानवडी) हा जखमी झाला आहे. रिदा आणि नटराज हे दोघे खराडीतील एका आयटी कंपनीत संगणक अभियंता आहेत.

ते ॲपद्वारे मार्ग शोधून वानवडीला जात होते. परंतु ॲपवर त्यांना मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्ग दाखविला. ते त्या दिशेने जात असताना चुकून नवीन कात्रज बोगद्याकडे गेले. खेड शिवापूरकडे जात असल्याचे लक्षात आल्यानंतर नटराजने नवीन कात्रज बोगद्याजवळून दुचाकी वळवली. त्या वेळी भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यात रिदाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितच्या 'त्या' गंभीर आरोपावर स्टार स्पोर्ट्सचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'क्लिपमध्ये फक्त...'

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT