condition of Market Yard in Pune today on Bharat Bandh 
पुणे

Bharat Bandh : जाणुन घ्या, पुण्यातील मार्केट यार्डात आज काय आहे स्थिती?

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड : केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांनी मंगळवारी भारत बंदची हाक दिलेली आहे. याला मार्केट यार्डातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. याचा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समितीमधे मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. मंगळवारी मार्केट यार्डात शेतमालाची फक्त दहा टक्केच आवक झाली. 

इतर दिवशी मार्केट यार्डात दररोज किमान ८००-९००  गाड्यांमधून बाजार समितीतील फळं आणि भाजीपाल्याची आवक होत असते. परंतु आज फक्त १५०-१७५ गाड्यांची अवाक झाली होती. त्यामुळे बाजारात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून आला. बाजारात दररोजच्या पेक्षा ५ टक्केच ग्राहक, व्यापारी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाजार समितीतील किराणा आणि भुसार मालाची बाजारपेठ शेतकरी बंदच्या समर्थनार्थ बंद ठेवण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला.हमाल ही सहभागी झाले असल्याने मार्केट मध्ये शांतता दिसत आहे. मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियन, हमाल पंचायत, महात्मा फुले कामगार संघटना, मार्केटयार्ड टेम्पो संघटना, महाराष्ट्र जनरल कामगार युनियन, राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन या सर्व संघटनांनी शेतकऱ्यांचा बंदला पाठींबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Arrested in Nashik : शिर्डी ते नाशिकपर्यंत पसरलंय खरातच्या पापाचं जाळं; आता SIT लावणार छडा, महाराष्ट्रात कुठे कुठे गुन्हे दाखल?

थक्क करणार क्लायमॅक्स, हमजाची धडाकेबाज एन्ट्री आणि कराचीत माजवलेला कहर, कसा आहे dhurandhar 2 ?

Latest Marathi News Live Update : बिडकीनमध्ये गॅस तुटवड्याने नागरिकांची धावपळ वाढली

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा ‘गेमचेंजर’ निर्णय! ‘तारीख पे तारीख’चा खेळ थांबवला! काय आहे नवा फॉर्म्युला?

संजू सॅमसनला पुढचा MS Dhoni होण्याची गरज नाही, तो...! गौतम गंभीरच्या विधानाची चर्चा; शशी थरूर यांच्या वक्तव्यावर दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT