Chandrashekhar-Shisode 
पुणे

महत्वाची बातमी : युपीआयची खात्री करुनच मदत पाठवा - चंद्रशेखर शिसोदे

सकाळवृत्तसेवा

पुणे - खरेदी केल्यावर किंवा कुणाला पैसे पाठवायचे असेल, तर आपण अनेकदा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करतो. त्यासाठी अतिशय सुलभ असलेला 'युपीआय' क्रमांक नोंदवून पैसे 'सेंड' करतो. पण, यात एखादी चूक झाली तर, पैसे दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात जाऊ शकतात. आणि जर अशी चूक 'पंतप्रधान सहायता निधी' साठी असलेल्या खात्याबाबत झाली  तर, कल्पनाच नको. अशी होणारी संभाव्य चूक एका पुणेकराने उघडकीस आणली  आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. लोकांना ऑनलाईन पद्धतीने ' पंतप्रधानq सहायता निधी'त योगदान देता यावे, म्हणून एक 'युपीआय'क्रमांक ही जाहीर केला. परंतु, पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या क्रमांकाशी बरेचसे साम्य दाखवणारा खोटा क्रमांकही अस्तित्वात होता. यामुळे क्रमांकात थोडी चूक करणाऱ्या नागरिकांचे लाखो रुपये चूकीच्या व्यक्तीला जाण्याची शक्यता होती.

पाषाण  पंचवटी येथील रहिवासी चंद्रशेखर शिसोदे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. पंतप्रधानांनी  pmcares@sbi वर मदत पाठवा असे आवाहन केले आहे.मात्र याच्याशीच साम्य दाखवणारा, पण ज्यामध्ये शेवटचे  'एस' अक्षर नाही असा pmcare@sbi युपीआय आय डी  अस्तित्वात आहे. त्यामुळे नागरिकांचे पैसे वेगळ्याच खात्यावर जाण्याची शक्यता आहे. हा धोका ओळखून शिसोदे यांनी भारतीय स्टेट बँक आणि पंतप्रधान कार्यालयाला ट्विटर द्वारे कळवले. स्टेट बँकेने याची दखल घेत तातडीने, खोटा असलेला युपीआय क्रमांक हटवला आहे.  नागरिकांनीही सहायता निधी पाठवताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिक  पंतप्रधान सहाय्यता निधीला आर्थिक मदत करणार आहेत . मात्र ती  करताना कृपया खाते क्रमांक आणि युपीआय आय डी नीट तपासूनच पैसे पाठवावेत. 
- चंद्रशेखर शिसोदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT