footprint 
पुणे

कोऱ्हाळे परिसरात आढळलेले पायांचे ठसे कोणाचे? बिबट्या की तरस?

चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर : कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात बोकड ठार झाला. तर एक शेळी गंभीर जखमी झाली आहे. मंगळवारी (ता. 8) पहाटे दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. बिबट्याने हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शींचे मत आहे. तर हल्ला करणारा प्राणी तरस असू शकतो असा अंदाज वनकर्मचाऱ्यांचा आहे. 

कोऱ्हाळे खुर्द येथील तेरा फाट्या जवळील नानासाहेब भगवान खोमणे यांच्या घरासमोर बांधलेले सहा महिन्याचा बोकड वन्य प्राण्याने जवळच्या उसाच्या शेतात फरपटत नेऊन फस्त केला. तसेच बापूराव गोपाळा खोमणे यांच्या शेळीवर हल्ला केला. यावेळी आजूबाजूच्या शेळ्या ओरडू लागल्याने घरातील लोकांना जाग आली. बिबट्या सारखा प्राणी शेळीची मान पकडत असल्याने घरातील सर्वांनी पाहताच आरडा ओरडा केल्याने प्राणी पळून गेला. प्रत्यक्षदर्शींनी बिबट्‌या असल्याचे सांगितले. 

घटनास्थळी वनरक्षक योगेश कोकाटे, वनकर्मचारी संपत खोमणे, विठ्ठल जाधव, दादा जाधव यांनी येऊन पाहणी केली. ठसे तपासून पंचनामा केला. हल्ला करणारा प्राणी तरस असू शकतो असा अंदाज खोमणे यांनी व्यक्त केला. सोमवारी रात्री 8 वाजता माळशिकारे वस्तीवर महादेव माळशिकारे, आनंदा माहांगडे यांना बिबट्यासारखा प्राणी दिसला होता.

चार दिवसांपूर्वी कऱ्हावागज येथील संजीवनी गावडे महिलेवर हल्ला केला होता. दोन दिवसांपूर्वी पणदरे खिंडीत वाहन चालकांना दिसला होता. परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सोशल मिडियावर चालली आहे. यामुळे नागरिक संभ्रम अवस्थेत आहेत. सध्या बाजरी काढणीचे दिवस आहेत. अनेक नागरिक शेतात कामाला जायला घाबरत आहेत.

याबाबत बारामती विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे म्हणाले, "या परिसरात आढळलेले ठसे मोठे असल्याने बिबट्याची शक्‍यता नाकारता येत नाही. वनकर्मचारी परिसरात गस्त घालणार आहेत.' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : नाशिकच्या सुरगाणामध्ये पुन्हा भुकंपाचे धक्के

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT