strike pune sakal
पुणे

Pune News : तोलणारांच्या संपामुळे शेतकरी-व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम

मांजरी उपबाजारातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मापाडी होत गैरसोय केली दूर

अशोक बालगुडे

उंड्री : तोलणारांच्या संपामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेवाळेवाडी येथील मांजरी उपबाजारामध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना विश्वास दिला

वजन-माप आणि पावत्या (बिल) करण्यासाठी बाजार समितीचे अधिकारी-कर्मचारी कार्यरत करून व्यापारी आणि शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ दिली नाही, असे मांजरी उपबाजारप्रमुख विजय घुले यांनी सांगितले. याप्रसंगी राहुल शेवाळे, भारती घुले, चेतन घुले, लाला जाधव, रावसाहेब फुलावरे, कुलदीप पवार, शेखर घाडगे, विनोद सातव, ओंकार गायकवाड, शेतकरी-व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रमेश उंद्रे म्हणाले की, शेतकरी-व्यापाऱ्यांना थेट जोडणारा दुवा म्हणून मांजरी उपबाजार कार्यरत आहे. शेतकरी-व्यापऱ्यांचा विश्वास मिळविलेली एकमेव बाजारपेठ आहे. दिवसेंदिवस या बाजारामध्ये शेतमाल घेऊन येणारे शेतकरी आणि व्यापाऱ्यांची संख्या वाढत आहे. शेतकरी-व्यापाऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासन कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातून शेतकरी येथे शेतमाल घेऊन येतात, त्यासाठी अनेक शेतकरी रात्री भाजीपाला, फळभाज्यांची तोड करून कॅरेट भरून ठेवतात. दुपारी बारा ते एकच्या दरम्यान मांजरी उपबाजारामध्ये आम्ही शेतमाल घेऊन येतो. नरेंद्र पाटील माथाडी संघटनेच्या संपामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, बाजार समितीने योग्य उपाययोजना केल्यामुळे कोणतीही अडचण झाली नाही.

तानाजी काळे, शेतकरी, इंदापूर

मांजरी उपबाजारमध्ये तोलणार-मापाड्यांची जागा बाजार समितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली. दररोजच्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आज संख्याबळ कमी असल्याने काही वेळ लागला. मात्र, कोणाचीही अडचण झाली नाही. शेतमाल खराब होणार नाही याची शेतकरी-व्यापारी आणि बाजार समितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे पाहायला मिळाले.

सर्जेराव बोराडे, शेतकरी, बारामती

तोलणार संघटना मांजरी उपबाजारचे अध्यक्ष संजय गायकवाड म्हणाले की, माथाडी कामगारांच्या अनेक मागण्या असून, त्याची पूर्तता शासनाकडून होत नाही. त्यामुळे आज (मंगळवार, दि. 1 फेब्रुवारी, 2023) महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनिनने एक दिवशीय राज्यव्यापी बंद पुकारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT