MIT  Sakal
पुणे

लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या केंद्रावर गोंधळ

सारथीमार्फत एमपीएससीच्या कोचिंग प्रायोजकत्व परीक्षा तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांनी दिली दोनदा

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर - येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या केंद्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेच्या सारथीमार्फत कोचिंगकरिता प्रायोजकत्व होण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे दोनदा ऑनलाईन परीक्षा द्यावी लागली आहे. त्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठामध्ये रविवारी (ता. १९) सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास परीक्षेसाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी एमआयटी येथे परीक्षेला आले होते. यावेळी परीक्षेचा कालवधी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुलांचा प्रवेश झाला व साडेआकरा वाजता ऑनलाईन पेपर सुरु झाला. पेपर हा दोन तासांचा असतानाही दुपारचे दोन वाजले तरी पेपर सबमिट होत नव्हता. त्यानंतर विद्यार्थी थोडा वेळ परीक्षा केंद्रावर बसून निघून गेले.

अर्ध्या तासानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा बोलाविण्यात आले. व सांगण्यात आले कि सारथीमार्फत आणखी एक लिंक आलेली आहे. व तुम्हाला परत परीक्षा द्यावी लागणार आहे. विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी पुन्हा परीक्षा केंद्रावर बसले. आणि थोड्यावेळानंतर सारथीच्या वतीने पुन्हा पेपर सुरु झाला. परीक्षेचा कालावधी संपल्यानंतरही विद्यार्थ्यांनी पुन्हा दुपारी चार वाजेपर्यंत परीक्षा दिली. काही विद्यार्थ्यांचे पेपर सबमिट झाले आहेत. तर दोन्ही परीक्षा देऊनही काही विद्यार्थ्यांचे पेपर सबमिट झालेच नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या अर्थात सारथीच्या वतीने मराठा, कुणबी आणि मराठा कुणबी या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रतिमा आठ हजार रुपये व एक वर्षासाठी मोफत कोचिंग क्लासेस दिला जातो.

याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर सारथीच्या अधिकारी म्हणाल्या कि, परीक्षार्थींचे पेपरच्या संदर्भातील अडचण समजताच, आम्ही परीक्षा केंद्रावर त्वरित दाखल झालो. तेव्हा विद्यार्थ्यांनी परीक्षेचा पेपर दिला होता. मात्र, त्यांचा पेपर सबमिट होत नव्हता. सारथीच्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा द्यावी लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. हि अडचण लोणी काळभोर येथील केंद्रावर आलेली आहे. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल.

याबाबत परीक्षेस बसलेले विद्यार्थी म्हणाले, "सारथीच्या मार्फत आज दोनदा पेपर घेण्यात आला आहे. यामुळे आमचा पहिला पेपर गृहीत धरला जाईल का दुसरा धरला जाईल हे निश्चित सांगता येणार नाही.तसेच दोन्ही वेळेसची पेपर सबमिट झाले नाहीत. यामुळे पेपर फुटला असल्याची शंका अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली तसेच दोनदा लिंक आल्यामुळे परीक्षेमध्ये पारदर्शकता राहिली नसल्याचा आरोप उपस्थित विद्यार्थ्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : मराठी संघटना आज पोलिस उपायुक्तांची भेट घेणार

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT