पुणे

MSEB ने पाठवलेल्या बिलात घोळ; चौकशीसाठी गेलेल्या ग्राहकांना...

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊनच्या काळातील सरासरी वीजबिल पाठविण्यात आलेले आहे, कोणताही अतिरिक्त शुल्क आकारलेले नाही,' असा महावितरणने केलेला दावा पोकळ असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात शहरातील अनेक ग्राहकांना महावितरणकडून पाठविण्यात आलेल्या वीजबिलात अनेक घोळ असल्याचे समोर आले आहे. झालेली चूक निदर्शनास आणून देण्यासाठी गेल्यानंतर देखील महावितरणकडून मात्र उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्या आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून तीन महिन्यांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे या काळात महावितरणकडून घरोघर जाऊन मीटर रीडिंग बंद करण्यात आले होते. या कालावधीतील वीजबिल हे सरासरी वीजबिल पाठविण्यात येईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार ग्राहकांना जे वीजबिल पाठविण्यात आले. त्यापैकी बहुतांश नागरिकांनी ते बिल आदा केले. मात्र, या महिन्यात महावितरणकडून रीडिंग घेणे सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर जे बिले ग्राहकांना पाठविण्यात आली आहेत. त्यामध्ये अनेक प्रकाराचे घोळ असल्याचे समोर आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एप्रिल आणि मे महिन्यातील वीजबिल भरले आहे. तरीदेखील जून महिन्यांच्या बिलामध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. दरमहिना सरासरी वीज वापर हा 124 ते 130 युनिट असताना देखील सहाशे युनिटपेक्षा अधिक वीजवापर धरून बिल पाठविण्यात आले आहे. या व अशा अनेक स्वरूपाच्या तक्रारी नागरिकांकडून सकाळकडे आल्या आहेत. यासंदर्भात महावितरणकडे चौकशी गेल्यानंतर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात आले. यावरून महावितरणच्या या कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एप्रिल आणि मे चे बिल भरून देखील जून महिन्यांच्या बिलात ती रक्कम कपात करण्यात आलेली नाही. दर महिना साधारणपणे आठशे रुपये वीजबिल येते. ते 3 हजार रुपये पाठविले आहे. महावितरणच्या कार्यालयात चौकशीसाठी गेल्यानंतर कोणतीही मदत करण्यास तयार नाही. उलट उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. 

- ऊर्मिला पंडित, रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT