khadki.jpg
khadki.jpg 
पुणे

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रारूप मतदारयादीत घोळ : कार्तिकी हिवरकर

हरीश शर्मा

खडकी बाजार : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी नवीन  प्रारूप मतदारयादी तयार केली आहे त्या यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विद्यमान सदस्या व आरोग्य समितीच्या अध्यक्ष कार्तिकी हिवरकर यांनी केला असून, संबंधित दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर एम जे कुमार, व बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

कार्तिकी हिवरकर या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रेंजहिल येथील वॉर्ड क्रमांक 5 च्या विद्यमान सदस्या आहेत. आगामी निवडणुकीचे तयारी निमित्त दोन महिन्यांपूर्वी बोर्डाने आठ वॉर्डाची प्रारूप मतदारयादी तयार करण्यासाठी बोर्डाचे कर्मचारी व बोर्डाच्या शाळेतील शिक्षकांची नेमणूक करून नवीन मतदारयादी तयार केली होती व त्या यादीवर हरकती व सुचना मागवण्यासाठी मतदारयादी बोर्डाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.

दरम्यान त्याचवेळी त्यांच्या वॉर्डातील मतदार संख्या व नावे याबद्दल हिवरकर यांच्या मनात शंका निर्माण झाली त्यांनी तातडीने सखोल अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले त्यांनी स्वतः अधिक माहिती मिळवण्यासाठी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची नवीन यादी व रेंजहिल येथील  ऍम्युनेशन फॅक्टरी येथील कामगार वसाहत मध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी मिळवली दोन्ही मध्ये फरक आढळून आला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले ज्या सदनिका बंद आहे, ज्यामध्ये कोणी राहत नाही, ते कोणाच्या नावावरही नाही अश्या सदनिकांमध्येही भलत्याच कोणाची तरी नावे बोर्डाच्या मतदारयादीत आढळून आली.

तर एकाच सदनिकांमध्ये दोन वेगवेगळ्या धर्माच्या  कुटुंबांची नावे असल्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला तसेच अनेक घोळ त्यांना यादीमध्ये आढळले. तयामुळे त्यांनी बोर्डाचया वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबद्दल तक्रार केली असून या प्रकरणात जे कोणी दोषी आढळून येईल त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी हिवरकर यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती घेण्याकरिता खड। की कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंह यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक सुजा जेम्स यांच्याशी याबाबत विचारणा केली असता जेम्स यांनी सांगितले की, प्रारूप मतदारयादीत घोळ असल्याचा आरोप सदस्या कार्तिकी हिवरकर यांनी केला आहे त्याबाबत ज्या शिक्षकांनी मतदारयादी चे काम केले आहे त्याबाबत त्यांच्याशी सखोल चौकशी बोर्डामार्फत करण्यात येत आहे पूर्ण माहिती घेऊन बोर्डातर्फे याबाबत लवकरच खुलासा केला जाईल.

(Edited by : sagar diliprao shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : खराब सुरूवातीनंतर लखनौनं डाव सावरला; राहुलची आक्रमक फलंदाजी

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT