पुणे

शिक्षकांच्या आरोग्य तपासणीवरून गोंधळ

CD

पुणे, ता. १५ : पुणे महापालिकेच्या शाळांसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड झालेल्या शिक्षकांची गाडीखाना येथील डॉ. कोटनीस दवाखान्यात आरोग्य तपासणी करणार असल्याने सुमारे २०० शिक्षक तेथे आज सकाळी हजर झाले. मात्र, शनिवार दुपारनंतर दवाखाना बंद असल्याने गोंधळ उडाला. या शिक्षकांची पुढील आठवड्यात तपासणी होणार असल्याचे सांगण्यात आल्याने सर्वजण माघारी फिरले.
अनेक वर्षांपासून महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक भरती झालेली नाही. सुमारे ५५० हून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. राज्य सरकारने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरु केल्याने त्यामधून महापालिकेला २२१ शिक्षक मिळाले आहेत. शुक्रवारी (ता. १४) महापालिकेत त्यांचे समुपदेशन करून नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच शाळांचे वाटपही करण्यात आले.
समुपदेशनाच्या ठिकाणी डॉ. कोटनीस दवाखान्यातून आरोग्य तपासणी करून घ्या, त्यानंतरच शाळांमध्ये हजर करून घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे शनिवारी (ता. १५) सकाळी आरोग्य तपासणीसाठी सुमारे २०० शिक्षक त्या ठिकाणी हजर झाले. यामध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या अनेक महिलांचाही समावेश होता. आज दुपारी सुट्टी आहे. त्यामुळे आरोग्य तपासणी होणार नाही, असे दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच अनेकांना ३, ४ जुलै अशा तारखा देवून नोंद करून घेतली. त्यावरून गोंधळ सुरु झाला.
काही जणांची तपासणी करण्यात आली. मात्र, आरोग्य तपासणीचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय शाळेमध्ये रुजू करून घेतले जात नाही, त्यामुळे सर्व शिक्षक भांबावून गेले. महापालिका अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार गेल्यानंतर या शिक्षकांना आज येण्याचा निरोप कोणी दिला?, असा प्रश्‍न उपस्थित केला.

आज शिक्षकांना आरोग्य तपासणीसाठी बोलविण्यात आलेले नव्हते. या शिक्षकांची मंगळवार आणि बुधवारी या दोन दिवसांत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून डॉक्टर व इतर मनुष्यबळाचे नियोजन करण्यास सांगितले आहे.
- रवींद्र बिनवडे,
अतिरिक्त आयुक्त, महापालिका


शाळेत रुजू होण्यासाठी आरोग्य प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. त्यासाठी आम्हाला कोटनीस दवाखान्यात तपासणी करण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार माझ्यासह अनेकजण तेथे गेलो. पण, शनिवारी दुपारनंतर दवाखाना बंद असल्याचे सांगण्यात आल्याने एकपर्यंत थांबून आम्ही निघून गेलो.
- एक शिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT