Manoj Jarange Esakal
पुणे

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या सभेत गोंधळ! आंदोलकाचा मंचावर भाषण करण्याचा प्रयत्न

तरूणाने मंचावर जाऊन भाषण करण्याचा आणि घोषणा देण्याचा प्रयत्न केला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आरक्षणासाठी आक्रमक लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांच्या सध्या राज्यभरात विविध भागामध्ये सभा होत आहेत. आरक्षणासाठी सरकारला २८ ऑक्टोंबरपर्यंतची मुदत दिल्यानंतर जरांगे पाटील राज्यभर दौरे करत आहेत. आज (शुक्रवार, २० ऑक्टोंबर) पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये त्यांची सभा होत असून या विराटसभेतून जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, या सभेवेळी मनोज जरांगे यांनी जमलेल्या गर्दीला संबोधित केलं सरतेशेवटी मंचावर काल आत्महत्या केलेल्या कावळे यांना श्रध्दाजंली देण्यासाठी सर्वजण उभे असतानाच अचानक एका आंदोलकाने मंचावर भाषण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे सभेमध्ये गोंधळ झाल्याचे दिसून आले. या तरूणाने मंचावर जाऊन भाषण करण्याचा आणि घोषणा देण्याचा प्रयत्न केला.

सभेत काय घडलं?

मनोज जरांगे यांनी भाषण केलं त्यावेळी ते म्हणाले सर्वांना मला भेटायचं असतं पण शक्य होतं नाही, या मुद्द्यावर त्यांनी भाषण संपवलं, त्यानंतर काल मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आंदोलकाला श्रध्दाजंली देण्याचं ठरलं. त्याबाबतची घोषणा देखील झाली. त्याचवेळी एक तरूण मंचावर आला. तो आक्रमक दिसून आला, त्याने माईक हातात घेत बोलण्याचा प्रयत्न केला. वेळीच त्याला आयोजक आणि पोलसांनी आवरण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर त्याला बाजूला घेण्यात आलं. जरांगे यांनी देखील त्या तरूणाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची अपेक्षा काय होती. त्याला काय बोलायचं होतं याबाबत माहीती नाही, मात्र काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT