पुणे, ता. २५ : ‘‘महाविकास आघाडीच्या ध्येय-धोरणांवर विश्वास ठेवून निवडून आलेल्या खासदारांनी भाजप-महायुतीत प्रवेश करणे, हा मतदारांशी केलेला विश्वासघात आहे. विकास निधी मिळत नसल्याचे कारण देऊन पक्षांतर करणे, ही सत्ताधाऱ्यांच्या कारभाराची पोलखोल असून जनतेवर सूड उगवण्याचा हा निंदनीय प्रकार आहे,’’ अशी टीका प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.
संबंधित मतदारसंघांतील जनतेने भाजप-महायुती विरोधात मतदान करून पर्यायी लोकप्रतिनिधींची निवड केली होती. मात्र, केवळ सत्तेसाठी जनतेच्या कौलाचा अनादर केला जात असल्याचे तिवारी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘राज्यातील जनतेने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीला ३१, तर भाजप-एनडीएला १७ जागा देऊन महायुतीविरोधी कौल स्पष्ट केला आहे. असे असताना विरोधी खासदारांच्या मतदारसंघात विकास निधी रोखणे, हा देशात सर्वाधिक महसूल देणाऱ्या राज्याशी द्रोह आहे.’’ अशी सापत्नपणाची वागणूक काँग्रेस व महाविकास आघाडी खपवून घेणार नसून सरकारविरोधात सविनय कायदेभंग आणि असहकार आंदोलन पुकारले जाईल, असा इशाराही तिवारी यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.