सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.६ ः राहुल गांधी यांचे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी काँग्रेस हरतऱ्हेचे प्रयत्न करीत आहे. त्यासाठी आता देशात अराजकता पसरवली जात असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज केला. केंद्रातले सरकार कसे बदलता येईल आणि गांधी यांना सहजपणे कसे सत्तेत बसविता येईल, यासाठी विरोधी पक्षांचा आटापिटा सुरू आहे. त्याच हेतूने देशाच्या लोकशाही प्रणालीवर आणि घटनात्मक संस्थांवर हल्ले केले जात असल्याचे पात्रा म्हणाले. ‘‘जनतेकडे बुद्धी आणि ज्ञान आहे. जे लोक घराणेशाही, भ्रष्टाचार व दहशतवादाविरोधात लढू शकत नाहीत, त्यांना निवडून द्यायचे नाही, हा लोकांचा निर्धार आहे. वारंवार भाजप कशी निवडून येते, हा विरोधकांचा आक्षेप आहे. मात्र ज्ञानेशकुमार यांच्यामुळे नव्हे तर बुद्धी, विद्या आणि ज्ञानाची देवता भगवान गणेशामुळे भाजप निवडणुकांत विजय मिळवत आहे. कॅ. स्मित मच्छार यांच्यासाठी जे बोलू शकत नाहीत, त्यांना मत द्यायचे नाही,’’ हा लोकांचा निर्धार असल्याचा टोला पात्रा यांनी मारला.
मतदारयाद्यांतून २.८ कोटी मृत मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत. ही नावे हटवायला नको होती का?, याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि हिमाचलमध्ये मतचोरीच्या माध्यमातून सरकारे बनली का?, अशा प्रश्नांची उत्तरे काँग्रेसने द्यावीत.
संबित पात्रा, राष्ट्रीय प्रवक्ते, भाजप
मतदारयादीत बोगस मतदारांची नावे असल्याचा आरोप यापूर्वी काँग्रेस करीत असे. यासाठी निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’ मोहीम हाती घेतली आहे. ही प्रक्रिया सुरू असताना त्यावर राहुल गांधी आणि काँग्रेस प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. काँग्रेसची भूमिका विरोधाभासाची आहे.
सुधांशू त्रिवेदी, खासदार, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.