Congress defeated by NCP in a cricket match Congress defeated by NCP in a cricket match
पुणे

धनंजय मुंडेंचा क्रिकेटनामा; राष्ट्रवादीने काँग्रेसला धूळ चारली

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सरकारनामातर्फे आयोजित क्रिकेटनामा स्पर्धेत (cricket match) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धुव्वा उडवला. सामन्यात राष्ट्रवादीकडून चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळाली. (Congress defeated by NCP in a cricket match)

काँग्रेस संघाचे कर्णधार आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची सुरुवात चांगली राहिली नाही. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) लवकरच मैदान सोडून (बाद झाले) गेले. यानंतर अनिकेत तटकरे यांनी संघाला सांभाळत विरोधकांचा सामना केला.

काँग्रेसच्या प्रत्येक प्रश्नाला (चेंडू) उत्तर देत (धावा काढत) २१ चेंडूत २४ धावा काढल्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयासाठी काँग्रेसला ६१ धावांचे आव्हान देण्यात आले होते. फलंदाजीसाठी आलेल्या काँग्रेसचीही (Congress) सुरुवात अडखळती झाली. पुरंदरचे धुरंदर आमदार संजय जगताप तीन धावा काढून बाद झाले. धनंजय मुंडे यांनी त्यांची विकेट काढली.

राजकीय मैदानात वरचढ ठरणारी काँग्रेस (Congress) क्रिकेटच्या मैदानात चाचपडताना दिसून आली. रोमहर्षक सामन्यात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला २७ धावांवर गारद करून सामना ३३ धावांनी जिंकला. एरव्ही राजकीय मैदानात जोरदार गोलंदाजी-फलंदाजी करणाऱ्या राजकीय नेत्यांची शनिवारी (ता. २८) क्रिकेटच्या मैदानातली कामगिरी जोरदार गाजली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कर्णधार पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) होते.

लाव रे तो व्हिडिओ

आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरल्या जाणाऱ्या डीआरएसची तांत्रिक सुविधा स्पर्धेच्या ठिकाणी आहे. त्यामुळे धावचितसारखे निर्णय मैदानावरील पंचांनी टीव्ही पंचाकडे सोपविले. त्यावेळी समालोचक ‘लाव रे तो व्हिडिओ’ असा पुकारा करायचे. त्यानंतर हास्याचे फवारे उडायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT