पुणे

किरीट सोम्मयांच्या वादात काँग्रेसची उडी; गोमूत्र टाकून पायऱ्यांचं शुद्धीकरण

सकाळ डिजिटल टीम

पुणे: किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते. पुणे महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यावेळी किरीट सोमय्यांचा महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर सत्कार करण्यात आला. सोमय्यांचा शाल, श्रीफळ आणि चाबूक देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार करायला पोलिसांकडून परवानगी नव्हती. मात्र तरीही हा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आता काँग्रेसने या पायऱ्यांचं गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून शुद्धीकरण केलं आहे.

काँग्रेसकडून गोमूत्राने पायऱ्या धुतल्या आहेत. वाद सुरु झाला होता तो शिवसेना आणि भाजपमध्ये... मात्र आता यात काँग्रेसने उडी घेतली आहे. गुलाबपुष्प आणि गोमूत्र शिंपडून पायऱ्या स्वच्छ केल्या आहेत. काँग्रेसकडून पायऱ्यांचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. आपचेही काही कार्यकर्ते दिसून आले. आमचं हे गांधी मार्गाने आंदोलन असल्याचं म्हटलंय. सचिन कारेकर या कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखली हे शुद्धीकरण करण्यात आलं.

यावेळी त्यांनी म्हटलंय की, भाजप सत्तेत आहे. मात्र, पुण्यात आरोग्याचे रस्त्यांचे प्रश्न आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांना किरीट सोमय्यांचा सत्कार महत्त्वाचा वाटतो. त्याचा निषेध म्हणून गांधीमार्गाने ही पायरी स्वच्छ केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT