Nana-Patole 
पुणे

'मी टिळकांसारखा जहाल'; नाना पटोलेंचा हल्लाबोल

सागर आव्हाड

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण राज्यात ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानाची आज सुरुवात करण्यात आलीये.

पुणे- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण राज्यात ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानाची आज सुरुवात करण्यात आलीये. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला. देशात सध्या हुकूमशाही सुरु आहे. विरोधकांवर कारवाई करत त्यांचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळे आपल्याला दुसरा स्वातंत्र्य लढा सुरु करावा लागेल, असं पटोले म्हणाले. (congress leader nana patole criticize governer bhagatsingh koshari bjp)

काही लोक माझ्याविरोधात दिल्लीत तक्रार करतात, मी जहाल असल्याचं म्हणतात. पण, मी टिळकांसारखा जहाल गटात मोडतोय, असं म्हणत त्यांनी स्वपक्षीय नेत्यांवर टीका केली. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधातील लढ्याची सुरूवातही टिळक वाड्यातून करूयात. हा देशाचा दुसरा स्वातंत्र्य लढाच म्हणा फारतर. पण ही लढाई आपण पुन्हा लढुयात आणि जिंकुयात, असं आवाहन पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं. चीन आपल्यावर कधीही हल्ला करु शकतो. पण, पंतप्रधान मोदी याविषयी काही बोलत नाही. आवाज उठवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाते. इंग्रजांचा काळ आणि आत्ताचा काळ यात काहीही फरक राहिला नाही. देशात हुकूमशाही सुरु आहे. ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, त्यांचीच बदनामी केली जात आहे, असंही ते म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर टीका

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. नेहरूमुळे देशाचं वाटोळं झाले हे राज्यपालांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. राज्यपाल भवन हे भाजप कार्यालय झालं आहे. राज्यपाल पदावर बसून राजकारण करता येत नाही. मी विधानसभेतही बोललो होतो. राज्यपाल हे भाजपचे कार्यकर्ता असल्यासारखे वागतात असा आरोप नाना पटोले यांनी केला.

नाना पटोले यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

-केंद्रामध्ये आलेले सरकार संविधान मानायला तयार नाही

- तो काळ नवीन पिढीसाठी प्रेरणा दायी

- चारही स्तंभ संपविण्याचे काम सुरू आहे

- पंडित जवाहरलाल नेहरूवर टीका करणे राज्यपाल यांना शोभत नाही

- टीका करायची तर खुर्ची सोडा, मग आम्ही बघू

- केंद्रातील सरकार जासुसी करत आहे

- तसा काँग्रेस पक्ष नाही

- अडचणीत आले आहेत त्यांना आम्ही मदत करतोय

- परिस्थिती प्रमाणे पूरग्रस्तांना मदतीचे कार्य सुरू

- माझी तक्रार देशाच्या प्रमुखाकडे होतेय

- नाना पटोले देशासाठी लढतोय

- हाय कमांडकडे कुठलीही तक्रार नाही

- Mpsc बाबत अजित दादांना भेटणार आहे

- आमचीही मागणी आहे, लवकर जागा भरल्या पाहिजे

- तोडण्याची भाषा म्हणजे त्या पक्षाची प्रवृत्ती आहे

- आमची प्रवृत्ती गांधी विचारांची

- त्यावर आम्ही काही जास्त बोलू इच्छित नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT