पुणे

राष्ट्रपतींची भेट घेतली

CD

राष्ट्रपतींची भेट घेतली
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या दहा नेत्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांना ‘मत चोरी’बद्दलचे निवेदन दिले. राष्ट्रपतींनी आम्हाला मतचोरीचे पुरावे सादर करण्यास सांगितले आणि आम्ही ते लवकरच एकत्र करून सादर करू, अशी माहिती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या भेटीनंतर पत्रकारांना दिली. तसेच, मतदानासाठी पुन्हा एकदा मतपत्रिकांचा (बॅलेट पेपर) वापर सुरू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांचाही समावेश होता. ‘आम्ही एकत्र आहोत, शक्तिशाली आहोत. आम्ही देशाच्या ६० टक्के जनतेचे प्रतिनिधित्व करतो,’ असे ममता यांनी सांगितले. तर, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी लोकशाही नष्ट करण्यासाठी कट रचल्याचे आम्ही निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे’, असे राहुल यांनी सांगितले. ‘‘राष्ट्रपतींनी आमचे म्हणणे ऐकून घेत निवेदनही स्वीकारले. त्यांनी आमच्याकडे पुराव्यांचीही मागणी केली. मतचोरी झाल्याचे सर्व देशाला माहिती आहे, राज्याराज्यांतून हा प्रकार घडल्याचे आम्ही राष्ट्रपतींना सांगितले, असेही राहुल यांनी सांगितले. शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला गेले असताना प्रियांका गांधींसह इंडिया आघाडीचे अनेक खासदार विजय चौकात बसून होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDIA Bloc Vijay Chowk Protest: 'इंडिया' आघाडीचे नेते राष्ट्रपती भवनात; विजय चौकात खासदारांचे ठिय्या आंदोलन

MP OBC Reservation : मोठी बातमी! मध्य प्रदेशात 27 टक्के OBC आरक्षणाला उच्च न्यायालयाचा नकार; 14 टक्के आरक्षण कायम, रखडलेल्या 13 टक्के जागा भरण्याचेही निर्देश

CJPच्या आंदोलनापूर्वी गृह मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवी दिल्लीत ४ किमीच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! देशभरातील 23 राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; मॉन्सूनच्या परतीची सीमा कुठपर्यंत? महाराष्ट्रात वातावरण कसं?

Ab De Villier Hundred: ११ Six, ६ Fours! एबीच्या ४० चेंडूंत ११४ धावा; ऑस्ट्रेलियाला धुतले, २१० धावांचे लक्ष्य सहज पार केले, तोच जलवा...

SCROLL FOR NEXT