Balasaheb Thorat  Esakal
पुणे

कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी पुन्हा एकदा भारताचे नेतृत्व करतील; बाळासाहेब थोरात

पुणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयाला ५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून सुवर्ण विजय द्विसप्ताहाचे आयोजन केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी पुन्हा एकदा भारताचे नेतृत्व करतील. यामुळे देशाला पुन्हा सोनियाचे दिवस येतील, अशी आशा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी (ता.९) पुण्यात बोलताना केली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर देश उभारणीत काँग्रेस पक्षाचे योगदान मोठे आहे. परंतु हे योगदान नागरिकांपर्यंत पोचवण्यात आपण कमी पडत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पुणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयाला ५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून सुवर्ण विजय द्विसप्ताहाचे आयोजन केले आहे. या द्विसप्ताहाअंतर्गत आयोजित केलेल्या ‘एक स्वाक्षरी शहीद जवानांच्या अभिवादनासाठी’ या उपक्रमात प्रथम स्वाक्षरी करून बाळासाहेब थोरात सहभागी झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, माजी आमदार उल्हास पवार, आबा बागूल, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, नगरसेवक अरविंद शिंदे, रफिक शेख, नगरसेविका लता राजगुरू, सुजाता शेट्टी, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, रजनी त्रिभुवन, वीरेंद्र किराड, जयश्री बागूल आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, ‘‘सध्या देशाचा इतिहास बदलण्याचे काम केले जात आहे. हे थांबवण्यासाठी सर्वांनी नागरिकांपर्यंत खरा इतिहास पोहचविण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे.भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि देश उभारणीत काँग्रेस आणि गांधी-नेहरू घराण्याचे असलेले योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांना चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. बातम्यांमधून बदनामी करण्याचे काम केले जात आहे. गांधी-नेहरूंच्या विरोधात बोलणाऱ्या महिलेला ४० जवानांचे संरक्षण देऊन पद्मश्री पुरस्कार दिला जात आहे.’’

भारत हे धर्मनिरपेक्ष विचारांवर उभे असलेले राष्ट्र आहे. त्यामुळे ते आजवर टिकून आहे. धर्मावर आधारलेल्या अनेक राष्ट्रांचे अनेक तुकडे झाले आहेत. दुर्दैवाने आज आपल्या देशाची वाटचाल धर्माच्या आधारावर सुरू असल्याचे मत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी यावेळी व्यक्त केले. तरुण पिढीमध्ये इतिहासातून देशभक्तीची प्रेरणा निर्माण होण्यासाठी आबा बागूल यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. महात्मा गांधी आणि देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा अपमान केला जातो. मात्र याचा निषेध करण्यासाठी एकही साहित्यिक पुढे येत नाही, हे दुर्दैव असल्याचे उल्हास पवार यांनी सांगितले. देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल (कै.) बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Attack: स्फोटकांनी भरलेली गाडी धडकली अन्...; पाकिस्तानात भीषण आत्मघाती हल्ला! १२ सैनिकांसह १५ जणांचा मृत्यू

Pilgrim Saved: पंढरपूर वारीत हृदयविकाराचा झटका; मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे वारकऱ्याचे प्राण वाचले

NEET Protest Pune: नीट पेपरफुटीविरोधात पुण्यात ‘जेन झी’ची तिरंगा पदयात्रा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गर्जना

Dharmendra Pradhan Resignation: धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात जेन-झीचा विराट एल्गार, पावसाला-धमक्यांना न जुमानता तरुणाई रस्त्यावर

Tribal Voters at Risk: कागदपत्रांच्या अडचणींमुळे आदिवासी मतदार वंचित होण्याचा धोका; मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांची प्रशासनाकडे सहकार्याची मागणी

SCROLL FOR NEXT