Congress protest against government in Kothrud to preserve democracy Vishwajit Kadam politics sakal
पुणे

Pune News : कोथरूड मध्ये काॅग्रेसचे सरकार विरोधात निषेध आंदोलन!

हा लढा लोकशाही टिकवण्यासाठी- विश्वजीत कदम

सकाळ वृत्तसेवा

कोथरूड : संसदेत, विधानसभेत विरोधकांचा आवाज दडपला जातो. हा लोकशाहीला कलंक आहे. आम्ही सुरू केलेला हा लढा, आंदोलन लोकशाही टिकवण्यासाठी आहे, अशा शब्दात माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी आंदोलना बाबत भूमिका मांडली.

कोथरूड ब्लॉक काॅग्रेस कमिटीने महर्षी कर्वे पुतळा चौक येथे निषेध आंदोलन आयोजित केले होते. त्यावेळी कदम यांनी विचार मांडले. संसदेत प्रश्न विचारणे गुन्हा? देश लुटणारांना चोर म्हणणे गुन्हा? अदानी बाबत चौकशी करण्यास सांगणे गुन्हा? असे प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

संयोजन माजी नगरसेवक रामचंद्र कदम यांनी केली. माजी मंत्री विश्वजीत कदम, रमेश बागवे, शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार दिप्ती चौधरी, मोहन जोशी, अभय छाजेड, दत्ता बहिरट, विजय खळदकर,

किशोर मारणे, मारोती माने, शिवाजी भोईटे, पांडुरंग गायकवाड, नयना सोनार, यशराज पारखी, अशोक शेलार, उमेश ठाकूर, सोनाली मारणे, आण्णा गोसावी, तात्या कसबे, सोमनाथ पवार, रविंद्र माझीरे, मनिषा करपे, गणेश मारणे, संजय मानकर, युवराज मेदगे, राजाभाऊ साठे आदी उपस्थित होते. गुंडा गर्दी नही चलेगी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. भामाबाई धोंडीबा आदमाने या ज्येष्ठ महिलेने आपल्या भावना व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR प्रक्रियेच्या १२ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव का नाही? निवडणूक आयोगाने थेट उत्तरच दिले!

Harman Investment Pune : पुण्यात होणार तब्बल ३४५ कोटींची गुंतवणूक; ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये मिळणार नोकऱ्या

New Year Horoscope Prediction : कोण होणार मालामाल आणि कुणाचं होणार नुकसान ? जाणून घ्या राशीनुसार नव्या वर्षाचं राशीभविष्य

Why is SIR Important: भारतात एसआयआर महत्त्वाचे का आहे? निवडणूक आयोगाने चार मोठी कारणे सांगितली!

Mokhada News : सकाळ बातमीचा परिणाम! नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी अधिकारी शेतात.

SCROLL FOR NEXT