Dr Ratnakar Mahajan Sakal
पुणे

काँग्रेसचे मुखपत्र 'शिदोरी' मासिकाचे संपादक डॉ. महाजन यांचा राजीनामा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुखपत्र जनमानसाची "शिदोरी" या मासिकाचे संपादक डॉ. रत्नाकर महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुखपत्र जनमानसाची "शिदोरी" या मासिकाचे संपादक डॉ. रत्नाकर महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून प्रदेश काँग्रेस कमिटीने अद्याप तो स्वीकारलेला नाही. कृपया शिदोरी च्या जबाबदारीतून मुक्त करावे व पर्यायी व्यवस्था करावी असे राजीनामा पत्रात डॉ. महाजन यांनी लिहिले आहे.

दरम्यान, शिदोरी मासिकाला जुलै २०२१ मध्ये १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. डॉ. महाजन यांच्यासह सर्वांनी शिदोरीच्या तपपूर्तीत यशस्वी वाटचाल केली आहे. जुलै २०१० मध्ये प्रदेश काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या पुढाकाराने शिदोरी मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. त्यानंतरच्या काळात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि आता नानासाहेब पटोले यांनी शिदोरीच्या अंकात लक्ष घातले आहे.

कोणत्याही पक्षाचे मुखपत्र पक्षाची भूमिका निर्भयपणे मांडणारे माध्यम असते. शिदोरी मासिकातून डॉ महाजन व सहकार्यानी काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोचविण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. शिदोरीच्या प्रत्येक अंकाची वाट पाहणारा मोठा वाचक वर्ग महाराष्ट्रात आहे.

डॉ.महाजन यांचा अमृत महोत्सव सोहळा जून महिन्यात झाला असून, पुण्यातील कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व इंदापूर येथील त्यांच्या पांच्याहत्तरीच्या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आले होते. यावेळी डॉ महाजन यांना राज्यसभेवर सदस्य म्हणून घेण्याची विनंती कार्यकर्त्यांनी केली होती.

दरम्यान, शिदोरीच्या संपादक पदावरून मुक्त करून, पर्यायी व्यवस्था करावी अशी विनंती डॉ. महाजन यांनी केली असून, फेसबुकवरही त्यांनी ही पोस्ट टाकली आहे. शिदोरी मासिकात काँग्रेसची विचारधारा डॉ महाजन यांच्यासारख्या विचारवंताने आतापर्यंत मांडली असून, अजूनही त्यांच्या विचाराची काँग्रेस पक्षाला गरज असल्याचे अनेक चाहते व वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT