पुणे

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मिळणार संघटन बळकटीकरणाचे धडे

CD

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना
संघटन बळकटीकरणाचे धडे

२६ ते २९ मे रोजी प्रशिक्षण शिबिर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : ‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियाना’अंतर्गत राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अभियानातून काँग्रेसने सात हजार पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यांना संघटन बळकट करण्याबाबतचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे २६ ते २९ मे यादरम्यान विभागनिहाय प्रशिक्षण शिबिर होणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विषयातील तज्ज्ञ या वेळी मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षक नियुक्त केले होते. त्यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसने दोन निरीक्षकांची नियुक्ती केली होती. या निरीक्षकांनी प्रत्येक जिल्हा, तालुक्यात जाऊन इच्छुकांकडून अर्ज मागवले, नंतर त्यांच्या मुलाखती घेऊन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेतून आघाडी, संघटना, विभाग व सेल यांचे पदाधिकारी नियुक्त करण्यात आलेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC CAPF Success Story: एक एकर शेती, शेतमजुरी अन् जिद्दीच्या जोरावर UPSC CAPF मध्ये २७९ वा क्रमांक; प्रवीण स्वामींची यशोगाथा..

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Kas Plateau Flower Festival : कास पठारावरील फुले पाहण्यासाठी आता 200 रुपये शुल्क; पठारावर जाण्यापूर्वी जाणून घ्या Online Booking ची सोपी पद्धत

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

SCROLL FOR NEXT