पुणे

काँग्रेसचा ऋतू बदल उपक्रम; पुणेकरांसाठी छत्री दुरुस्तीचा फंडा

शरयू काकडे

पुणे : आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन पुणे शहर कॉंग्रेसने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या छत्र्या दुरुस्त करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचे सोमवारी उद्घाटन झाले. १९ जूनपर्यंत कॉंग्रेसभवनमध्ये नागरिकांना मोफत छत्र्या दुरुस्त करून मिळणार आहे. !

नागरिकांच्या सोयीसाठी काँग्रेस पक्षाने छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला असून उपक्रमाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांच्या हस्ते काँग्रेस भवनात सोमवारी करण्यात आले. पहिल्याच दिवशी उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘‘सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम राबवून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सामाजिक जाणीवच व्यक्त केली आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि पुणे जिल्हा घरेलू कामगार संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघे यांनी केले.

काँग्रेस पक्षाचा हा उपक्रम सामान्य नागरिकांसाठी हाती घेण्यात आलेला आहे. दिनांक १९ जून पर्यंत सकाळी ११ ते सहा या वेळात छत्र्या मोफत दुरुस्त करुन देण्यात येतील. या उपक्रमांद्वारे लोकांची सोय होईल, असे जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले. सद्यस्थितीत केंद्र सरकारच्या धोरणांमुळे छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक गंडांतर आले. त्यांनाही हातभार लावण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी नगरसेवक अविनाश बागवे, मनीष आनंद, वीरेंद्र किराड, शेखर कपोते, कैलास कदम, युवक कार्याध्यक्ष राहुल शिरसाट, सचिन आडेकर, चेतन आगरवाल, प्रशांत सुरसे, आयुब पठाण, किशोर मारणे, स्वाती शिंदे, तिलेश मोता, नागेश भालेराव, अनिल अहिरे, चंद्रकांत चव्हाण, दिपक ओव्हाळ, मनोहर गाडेकर, अजित जाधव, अविनाश अडसुळ, बबलु कोळी, दुर्गा शुक्रे पाटील, नलिनी दोरगे, कांता ढोणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Accident: रुळावर होणारे अपघात टळणार, रेल्वेचा मोठा निर्णय, ११९ कोटींचा प्रकल्प हाती; वाचा सविस्तर

Harshvardhan Sapkal Statement : "ध" चा "मा" करून देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत; हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

T20 World Cup Super 8s Scenario : दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांचे स्थान पक्के; उर्वरित ६ जागांसाठी भारत-पाकिस्तानसह कोणात शर्यत?

JioHotstar Subscription Free : फ्रीमध्ये बघा भारत-पाकिस्तान T20 World Cup मॅच, 'या' आहेत 3 सोप्या ट्रिक..

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने वॉरंटच्या आधारे १२ ठिकाणी छापे

SCROLL FOR NEXT