Yerwada Jail News sakal
पुणे

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

येरवडा कारागृहात कैद्यांनी हवालदारास त्यांच्याच काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात हवालदाराच्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : येरवडा कारागृहात कैद्यांनी हवालदारास त्यांच्याच काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात हवालदाराच्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. नानासाहेब रामचंद्र मारणे (वय ५७) असे जखमी झालेल्या हवालदाराचे नाव आहे.

याबाबत मारणे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अपूर्व संजय खंडागळे, सूरज नारायण अडागळे, आनंद ऊर्फ सोनू सिद्धेश्वर धड आणि नीरज लक्ष्मण ढवळे या कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील सी. जे. विभागात दगडी भिंत पाडून नवीन बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मारणे रविवारी सकाळी गस्तीवर होते. त्यावेळी तेथील कैद्यांना भिंतीचा दगड लागल्यास इजा होईल, असे सांगितले.

कैद्यांनी मारणे यांच्या हातातील काठी हिसकावून घेतली. त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने डोक्यात, हातावर मारहाण केली. त्यात मारणे यांच्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाले. याबाबत मारणे यांनी सोमवारी तक्रार दिल्यानंतर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक अहिरे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

Simple Footpath Wedding: अमरावतीत उड्डाणपुलाखाली फुटपाथवर रंगला साधेपणाचा अनोखा विवाहसोहळा; सोशल मीडियावर कौतुकाची लाट

Successful National Lok Adalat: गंगापूर जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी; १०७ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा, ८० लाख रुपयांची वसुली

SCROLL FOR NEXT