पुणे

अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा

सकाळवृत्तसेवा

दौंड - लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्यासह व्हिडिओ व छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. तसेच अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 

दौंड ठाण्याचे अंमलदार श्रीरंग शिंदे यांनी सोमवारी (ता. 2) रात्री याबाबतची माहिती दिली. राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातमध्ये नोकरीस असलेला अमोल परशराम गिते याच्यासह परशराम आनंदा गिते, वंदना परशराम गिते, मयूर परशराम गिते (सर्व रा. सर्कल गणपती मंदिराजवळ, नाशिक) व साधना राहुल गडेकर (रा. नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. अमोल गिते याने 19 वर्षीय तरुणीशी ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखविले. तिच्यावर जून 2019 पासून नाशिक, पुणे व दौंड येथे अत्याचार केले. शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर अमोलने काढलेले व्हिडिओ व छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केले. लैंगिक छळाला कंटाळून सदर तरुणी दौंड ठाण्यात 17 जानेवारी 2020 रोजी तक्रार देण्यासाठी आली. तेव्हा अमोल गिते व त्याच्या कुटुंबीयांनी लग्न करण्याचे मान्य केले होते. 22 जानेवारीला अमोल याच्या कुटुंबीयांनी धुळे येथे मंदिरात गुपचूपपणे लग्न लावून दिले; परंतु लग्नानंतर शारीरिक अत्याचार करून तिला हाकलून दिले. तरुणीने सोमवारी फिर्याद दिली. त्यानुसार अमोल व त्याचे चार नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. फौजदार तेजस मोहिते तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

SCROLL FOR NEXT