पुणे

संविधान रॅली

CD

NPT26B08645
नातेपुते (ता. माळशिरस) : येथील डॉ. बा. ज. दाते प्रशालेच्या वतीने काढण्यात आलेल्या संविधान रॅलीत सहभागी विद्यार्थी.
---
दाते प्रशालेच्या वतीने
संविधान रॅली उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नातेपुते, ता. ४ : भारतीय संविधान सप्ताहाच्या निमित्ताने येथील डॉ. बा. ज. दाते प्रशालेच्या वतीने शहरात भव्य संविधान रॅली काढण्यात आली. संविधानाविषयी जनजागृती आणि महापुरुषांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या रॅलीत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
प्रशालेपासून सुरू झालेली ही रॅली पुणे- पंढरपूर रोड मार्गे नातेपुतेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोचली. येथे प्रशालेचे मुख्याध्यापक विनायक देशपांडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी या चौकात संविधानाच्या महत्त्वावर आधारित पथनाट्य सादर केले, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. रॅली शहरातील मुख्य पेठेतून (मेन पेठ) संविधान चौकात आली. या ठिकाणी संविधानाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. येथेही विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित नाटिका सादर करून लोकशाही आणि हक्कांची माहिती दिली.
यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी पोलिस स्टेशनला भेट दिली. पोलिस प्रशासनाचे कामकाज कसे चालते आणि कायद्याची अंमलबजावणी कशी होते, याची माहिती विद्यार्थ्यांनी यावेळी करून घेतली. या उपक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक विनायक देशपांडे, सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait : मोठी बातमी! भारतीय तेल जहाजे अडकलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचा हल्ला; अनेक इराणी जहाजे नष्ट!

Nagpur Crime : चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीला गर्भाशयाची पिशवी फाटेपर्यंत लाथाबुक्क्यांनी मारहाण; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, प्रियकराला अटक

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध

‘तुमच्या पोरीचं ५० वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं!’ विशालसोबतच्या चर्चेमुळे रुचिताच्या घरच्यांना त्रास; म्हणाली, ‘पप्पा खूप रडले आणि...’

Kolhapur Water Tax Hike : कोल्हापूर महापालिकेचा पहिला दणका! रहिवासी पाणीपट्टीसाठी १० टक्के दरवाढ निश्चित होणार

SCROLL FOR NEXT