पुणे

देशातील घडामोडींवर अभ्यासकांनी व्यक्त होण्याची गरज

CD

कोथरूड,  ता.‌ १० :  ‘‘घटना दुरुस्ती विधेयकावरून देशभरात चर्चा सुरू आहे.  पुण्यात १५ विधी महाविद्यालये आहेत. त्यामध्ये ४५ हून अधिक प्राध्यापक संविधान शिकवणारे आहेत, पण ही मंडळी समाजात व्यक्त होताना दिसत नाहीत. संविधान काय आहे हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे कर्तव्य आहे,’’ असे मत घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी व्यक्त केले.

कोथरूडमधील गांधी भवन येथे रविवारी ३१   वे गांधी दर्शन शिबिर पार पडले,  या वेळी पहिल्या सत्रात  ‘महिला आरक्षण,  डिलिमिटेशन विधेयक आणि घटनादुरुस्ती’ या विषयावर  घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट   यांनी आपले विचार मांडले. या वेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी डॉ. प्रवीण सप्तर्षी उपस्थित होते.

दुसऱ्या सत्रात ‘अस्थिर जग आणि आपण’  या विषयावर  ज्येष्ठ पत्रकार  जतीन देसाई यांनी मांडणी केली.  या सत्राचे अध्यक्ष अन्वर राजन होते. तिसऱ्या सत्रात  अनंत महादेवन  दिग्दर्शित  ‘फुले’ हा   चित्रपट दाखवण्यात आला.   कार्यक्रमाचे संयोजन   महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांनी केले.

प्रा. बापट म्हणाले की,  संसदेचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात. मात्र, आपल्याकडे  नवीन संसद इमारतीचे उद्घाटन झाले त्यावेळी त्यानांच बोलावले नाही.  अनेक वर्षांपासून संसदेला उपसभापती नाहीत.

-----------------
युद्ध सुरू करणे सोपे; संपवणे अवघड
जतीन देसाई म्हणाले की,   रशिया- युक्रेन युद्ध चार वर्षे सुरू आहे. रशियाचे साडेतीन ते पाच लाख जवान मारले गेले आहेत. आता अमेरिका, इस्रायलचे इराण विरोधात युद्ध सुरू आहे. युद्धामुळे लहान राष्ट्रेसुद्धा अणुबॉम्ब बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे अधिक धोकादायक आहे. युद्ध ज्वर परवडणारा नाही. युद्ध सुरू करणे सोपे, संपवणे अवघड असते. हल्ला करणाऱ्या राष्ट्राला आपण जिंकलो हे दाखवावे लागते.  ज्यांच्या सांगण्यावरून लोक थांबतील, असे जागतिक नेतृत्व नाही. युनोसुद्धा नाही, मात्र, महात्मा गांधी तसे नेतृत्व होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT