bridge.jpg 
पुणे

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील 'ते' दोन पूल पाडल्यावर पुढे काय? वाचा सविस्तर 

उमेश शेळेके

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौक आणि ई-स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल मे अखेर पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपुलासाठी सुमारे 260 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तो "पीपीपी' (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर उभारण्याचे नियोजन पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात आले आहे. 

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. गणेशखिंड रस्त्यावरून ही मेट्रो जाणार आहे. त्यासाठी या रस्त्यावर पुणे विद्यापीठ आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल अडथळा ठरत आहेत. त्यामुळे हे दोन्ही पूल पाडण्याचे नियोजन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे. तसा प्रस्ताव मान्यतेसाठी पीएमआरडीएने राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडे पाठविला आहे. 

तसेच हा पूल महापालिकेच्या खर्चातून बांधण्यात आला आहे. त्यामुळे पूल पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून 'ना हरकत प्रमाणपत्र' घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव पीएमआरडीएने महापालिकेकडे पाठविला आहे. लॉकडाऊनच्या काळात हे पूल पाडण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती या प्रस्तावात करण्यात आली आहे. हे दोन्ही पूल पाडून तेथे उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपुलास सुमारे 260 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

दरम्यान, हा सर्व खर्च पीएमआरडीएकडून केला जाणार आहे. मेट्रो प्रकल्पाचे काम टाटा-सिमेन्स या कंपनीला पीएमआरडीएकडून यापूर्वीच देण्यात आले आहे. हा संपूर्ण मेट्रो प्रकल्प पीपीपी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. या कंपनीकडून दोन उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन दुमजली पूल उभारण्याचे काम करून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी टाटा-सिमेन्स या कंपनीला पूल पाडण्यासाठी शॉर्ट टेंडर काढण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले. 

गणेशखिंड रस्त्यावरील पाडण्यात येणाऱ्या दोन्ही पुलांची मिळून एक किलो लांबी आहे. तर ते बारा मीटर रुंदीचे आहे. त्याऐवजी नव्याने उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाची लांबी ही 1 7 किलोमीटर असणार आहे. सर्वांत वरच्या पूल हा मेट्रोसाठी असणार आहे. तर त्या खालील पुलावर बीआरटी आणि खासगी वाहनांसाठी असणार आहे. नवीन उड्डाणपूल हा चार पदरी असणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT