Crime-Suicide
Crime-Suicide 
पुणे

आत्महत्यांचे सत्र थांबेना; कोथरूडमधील बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या करत संपवले जीवन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोथरुड येथील आशिष गार्डन परिसरात बांधकाम व्यावसायिकाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.२) घडली.

रामचंद्र लक्ष्मणराव बबलतकर (वय 55, रा. मुक्ताई सोसायटी, कोथरुड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बबलतकर हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचा बांधकाम व्यवसाय सोलापूर येथे आहे. ते त्यांची पत्नी आणि मुलासमवेत आशिष गार्डन परिसरातील मुक्ताई सोसायटीमध्ये राहात होते.

दरम्यान, गुरुवारी दुपारी त्यांनी सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिस घटनेच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या दोन आठवड्यांपासून शहरात आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. प्रत्येक दिवशी किमान एकतरी घटना घडल्याचे वृत्त माध्यमातून प्रसिद्ध होत आहे. आत्महत्या करण्याची कारणे वेगवेगळी आहेत. मात्र, या आत्महत्यांचे लोण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यामुळे सामान्य नागरिकांबरोबर पोलिस प्रशासनही हैराण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT