पुणे

आदिवासींसाठी वसतिगृहाचे वरदान

सकाळवृत्तसेवा

मंचर - सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या माळीण वसतिगृहाचे बांधकाम सुरू आहे. आतापर्यंत ४० टक्के बांधकाम झाले असून, मे २०१९ अखेर सर्व काम पूर्ण होईल. जूनमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गांत शिक्षण घेत असलेल्या गरीब व गरजू मुलांच्या निवासाची सोय होणार आहे.  

माळीण (ता. आंबेगाव) येथे ता. ३० जुलै २०१४ रोजी निसर्गाचा कोप झाल्याने डोंगर कोसळला. संपूर्ण गावठाण उद्‌ध्वस्त होऊन १५१ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनाग्रस्त गावासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’ने नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार जमा झालेल्या निधीतून आदिवासी मुलांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. आंबेगाव तालुक्‍यातील मुलांना शिक्षणासाठी घोडेगावला ये-जा करावी लागते; पण त्यांच्यासाठी वसतिगृह नसल्याने अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहात होती. वसतिगृह बांधकामासाठी जागेची नितांत गरज होती. घोडेगाव येथील ‘आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ’ या शिक्षण संस्थेने वसतिगृह बांधकामासाठी जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली. एकूण ७ हजार चौरस फूट क्षेत्रफळाची दुमजली इमारत येथे होणार आहे. हे वसतिगृह आदिवासी मुलांना शिक्षणासाठी वरदान ठरणार आहे.

तळमजला व पहिला मजला, अशी वसतिगृहाची इमारत आहे. तळमजल्यावर डायनिंग हॉल, किचन, लाँड्री, अधीक्षक निवास, अपंग विद्यार्थ्यांसाठी खोली, अशी व्यवस्था असेल. पहिल्या मजल्यावर दहा खोल्या असतील. प्रत्येक खोलीत सहा विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करण्यात येईल.
- सतीश कांबळे, वास्तुविशारद, पुणे

 शिक्षण घेण्यासाठी अनेक आदिवासी मुले इच्छुक असतात; पण त्यांची निवासाची व्यवस्था होत नाही. त्यामुळे घोडेगाव येथे आदिवासी मुलांसाठी वसतिगृह व्हावे, असा आमच्या संस्थेचा प्रयत्न होता. पण संस्थेकडे आर्थिक पाठबळ नव्हते. ‘सकाळ रिलीफ फंडा’ने केलेल्या सहकार्यामुळे वसतिगृहाचे बांधकाम सुरू झाले आहे. कामाचा दर्जाही चांगला आहे. मे २०१९ पर्यंत काम पूर्ण होऊन आदिवासी कुटुंबांतील गरजू मुलांना जूनमध्ये शिक्षणासाठी प्रवेश देता येईल.  
- अजित काळे, अध्यक्ष, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ, घोडेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: निळवंडे कालव्याचं काम मोदींमुळे पूर्ण झालं - देवेंद्र फडणवीस

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT