Maharera 
पुणे

बांधकाम प्रकल्पांना तीन महिने मुदतवाढ; 'महारेरा’चा निर्णय

सकाळवृत्तसेवा

‘महारेरा’चा निर्णय; ग्राहकांना द्यायच्या भरपाईत सूट देण्याची मागणी
पुणे - कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थीवर मात करण्यासाठी १५ मार्च नंतरच्या प्रकल्पांना तीन महिन्यांची मुदत वाढ देण्याचा निर्णय महारोराने घेतला आहे. परंतु हा कालावधी अत्यंत कमी आहे. त्यामुळे हरियानाच्या धर्तीवर राज्य सरकारने ही नोंदणीची मुदत सहा महिन्यांनी वाढवावी. तसेच या दरम्यानच्या कालावधीत ग्राहकांना द्यावयाच्या भरपाई बाबत सूट देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी बांधकाम क्षेत्राकडून केली जात आहे.

ग्राहकांना न्याय देण्याबरोबरच बांधकाम व्यवसायाला शिस्त आणण्यासाठी राज्य सरकारकडून ‘महारेरा’ची (महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी) स्थापना केली. त्यास उद्या तीन वर्ष पूर्ण होत आहे. या उद्देशाने महारेराची स्थापना करण्यात आली, तो उद्देश गेल्या तीन वर्षात सफल करण्यात महारेराला यश आले आहे. महारेराकडे नोंदणी झालेले प्रकल्प, ग्राहकांनी केलेल्या तक्रारी आणि एजंट यांच्या नोंदणीवरून ही माहिती समोर आली आहे. प्रकल्प नोंदणी, बांधकाम व्यावसायिकांच्या नोंदणीपासून सर्व कामे ऑनलाइन देणारे हे एकमेव खाते असल्याचा नावलौकिकही या खात्याने मिळविला आहे. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करण्यात देशातील महाराष्ट्र हे राज्य अग्रेसर ठरले आहे. देशभरातील महारेरांकडे नोंदविलेल्या एकूण प्रकल्पांच्या पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक प्रकल्प हे महाराष्ट्रात नोंदविले गेले आहेत. परंतु २४ मार्चपासून लॉकडाऊन लागू केला आहे.

त्यामुळे बांधकाम क्षेत्र ठप्प पडले आहे. हे ओळखून महारेराने १५ मार्चनंतर ज्या बांधकाम प्रकल्पांचा पूर्णत्वाचा दाखला घेणे बंधनकारक होते. त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊन कधी उठणार आणि त्यानंतर प्रकल्पांची कामे सुरळीत कधी होणार यांचा अंदाज अद्याप कोणाला नाही. त्यामुळे ही मुदत तीन महिन्यांऐवजी सहा महिने करावी. त्याचप्रमाणे या सहा महिन्यांच्या कालावधीत प्रकल्प विलंब झाल्यामुळे ग्राहकांना जे व्याज द्यावे लागणार आहे. त्यामध्ये सूट द्यावी, अशी मागणी मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना, क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांकडून केली जात आहे.

कोविड-१९ नंतरची परिस्थिती विचारात घेऊन नियमात काही बदल अथवा सवलती काय देता येतील, या संदभार्त केंद्रीय गृहमंत्र्यांनी नुकतीच देशातील सर्वच महारेराच्या अध्यक्षाची एकत्रित बैठक घेतली. तीन मे नंतर केंद्र सरकारकडून काही मार्गदर्शन येतील, त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. 
- डॉ. वसंत प्रभू, सचिव, महारेरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT