balewadi.jpg 
पुणे

बालेवाडी ते कस्पटे वस्तीला जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : बालेवाडी ते कस्पटे वस्तीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाच्या कामाला सुमारे सात वर्षांनी सुरवात झाली. त्यामुळे कस्पटे वस्तीकडून हिंजवडीला जाणाऱ्यांचे अंतर आठ किलोमीटरने कमी होणार आहे. त्याचप्रमाणे औंध, बाणेर, कस्पटेवस्ती येथील नागरिकांच्याही वेळेत बचत होणार आहे. 

पुणे महापालिकेने दहा कोटी 50 लाख रुपये खर्चाच्या निविदेला मंजुरी दिली आहे. या पुलाचे काम 2013 मध्ये सुरू झाले. त्या वेळी 70 टक्के काम पूर्ण झाले होते. या पुलाच्या खर्चाचा प्रत्येकी 50 टक्के वाटा पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका उचलणार आहे. चारपदरी पुलाचे काम एप्रिल 2017 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतील ऍप्रोच रस्त्यासाठीची जागा ताब्यात न मिळाल्याने हे काम रखडले होते. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेने एप्रिल 2018 मध्ये उर्वरित जागा ताब्यात घेतली. त्यानंतर पुणे महापालिकेने 28 जुलै 2018 ला या कामासंदर्भातील पहिली निविदा प्रसिद्ध केली. मात्र, जास्त किमतीच्या निविदा आल्याने निविदा प्रक्रिया पुन्हा राबविण्यात आली. 

या बाबत पुणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता इंद्रभान रणदिवे (प्रकल्प) म्हणाले, "संबंधित ठेकेदाराने सध्या स्वच्छतेचे काम सुरू केले आहे. या पुलाच्या कामाचा 25 मीटरचा स्पॅन आणि 60 ते 70 मीटरचा ऍप्रोच रस्ता करण्यात येणार आहे. येत्या 12 महिन्यात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.'' 


बालेवाडीकडील बाजूचे काम वेळेवर सुरू झाले. मात्र, उर्वरित जागा ताब्यात न मिळाल्यामुळे काम रखडले होते. आता जागा ताब्यात मिळाल्यामुळे कामाला सुरवात झाली आहे. 
- श्रीनिवास बोनाला, मुख्य अभियंता (प्रकल्प), पुणे महापालिका 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT