consumer forum in pune will soon get new building 
पुणे

पुण्यात ग्राहक मंचाला लवकरच नवीन इमारत 

सनील गाडेकर

पुणे : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच आणि राज्य आयोगाच्या परिक्रमा खंडपीठाच्या कार्यालयासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळ तीन हजार 20 चौरसमीटर जागा निश्‍चित झाली आहे.

तेथे बांधकाम करण्यासाठी राज्य सरकारकडून 10 कोटी 77 लाख 47 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार मंचाने याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून आराखडे मागविले होते. त्यातील इमारतीच्या बाह्य भागाचा आराखडा निश्‍चित झाला आहे. मंचाला आवश्‍यक असलेल्या बाबी नमूद केल्यानंतर बांधकाम विभाग अंतर्गत आराखडाही तयार करेल. आठ मजल्यांच्या या इमारतीमध्ये चार मजले पार्किंगसाठी पाचव्या मजल्यावर जिल्हा तर सहाव्या मजल्यावर अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे कार्यालय असेल. उर्वरित दोन मजल्यांवर जिल्हाधिकारी प्रशासनातील कार्यालये असणार आहेत, अशी माहिती मंचाकडून देण्यात आली. 

सध्या मंचाचे कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीत चौथ्या मजल्यावर आहे. याच ठिकाणी जिल्हा व अतिरिक्त जिल्हा ग्राहक निवारण मंच व राज्य आयोगाचे परिक्रमा खंडपीठ अशी तीन कार्यालये आहेत. या तीनही बेंचकरिता स्वतंत्र कोर्ट हॉलची आवश्‍यकता आहे. मात्र जागेअभावी दोनच कोर्ट हॉल उपलब्ध आहेत. त्यामुळे जिल्हा ग्राहक मंचाच्या बेंचचे कामकाज प्रसंगी अध्यक्षांच्या चेंबरमध्ये चालविले जाते. त्यामुळे नवीन इमारतीचा सातवा आणि आठवा मजला राज्य आणि केंद्र आयोगाच्या कार्यालयांसाठी द्यावा, अशी मागणी मंच प्रशासन आणि वकीलवर्ग करीत आहे. 

कार्यालयातील अपुऱ्या जागेमुळे सर्वांना काम करणे अवघड होत आहे. तसेच या ठिकाणी कोणत्याही सुविधा पुरविता येत नाहीत. पक्षकार, ग्राहक व वकील यांना कामकाजासाठी स्वतंत्र कक्ष असणे गरजेचे आहे. त्यामुळे इमारतीचे काम लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. 
- उमेश जावळीकर, अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : कमी दाबाचा पट्टा सक्रिय पण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार; पुढच्या चार दिवसांचा हवामान अंदाज असा

Ashadhi Ekadashi 2026 Marathi Wishes: "अवघा रंग एक झाला..." आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT