पुणे

वीज दरवाढीचा ग्राहकांना शॅाक

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला असतानाच महावितरणने वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार शंभर युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या ग्राहकांच्या महिन्याच्या वीजबिलात सुमारे साठ रुपयांनी वाढ होणार आहे, तर शंभर ते दोनशे युनिट वापर असलेल्या ग्राहकांच्या वीजबिलात सुमारे एकशे पंधरा ते सव्वाशे रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.

महावितरणने पुढील पाच वर्षांसाठीच्या वीजदरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. त्यावर आयोगाने ४ फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदणीसाठी मुदत दिली आहे.

वाढत्या महामागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे महावितरणला देखील बसला आहे. त्यामुळे महावितरणकडून ही दरवाढ प्रस्तावित करण्यात आल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

घरगुती वीजवापर असलेल्या ग्राहकांकडून स्थिर आकार सध्या ९० रुपये आकारण्यात येतो. त्यामध्येसुद्धा वीस रुपयांची वाढ प्रस्तावित करून तो ११० रुपये करावा, अशी मागणी महावितरणने केली आहे. या सर्वांची गोळाबेरीज केल्यानंतर प्रत्यक्षात दरमहा साठ ते सव्वाशे रुपयांपर्यंत वीजबिलात वाढ होणार आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांच्या वर्षभराच्या वीजबिलात एक हजार रुपयांहून अधिक वाढ होणार आहे.

शेजारच्या राज्यांपेक्षा आधीच महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक सर्वच कॅटेगरीत दर २०-२५ टक्‍क्‍याने जास्त आहे. या दरवाढीमुळे आधीच मंदीच्या विळख्यात सापडलेल्या व्यापार आणि उद्योगधंद्यांचे कंबरडे मोडणार आहे. महावितरणच्या अकार्यक्षम कारभाराचा फटका सर्वांनाच बसणार आहे. सौर ऊर्जेवर लादलेल्या दरवाढीमुळे महाराष्ट्रात सौर ऊर्जा निर्मिती ठप्प होऊन ग्राहकांचेच नाही, तर देशाचेही नुकसान होणार आहे.
- विवेक वेलणकर, सामाजिक कार्यकर्ते 

शहरात ६ फेब्रुवारीला सुनावणी
महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दिलेल्या या वीज दरवाढीच्या प्रस्तावावर आयोगाकडून राज्यभर सुनावणी घेण्यात येणार आहे. पुणे शहरात ६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. ४ फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत.

सध्याचे दर
   ३ रुपये ५ पैसे (शंभर यनिटपर्यंत)
   ६ रुपये ९५ पैसे 
     (शंभर ते दोनशे यनिटपर्यंत)
   ९० (स्थिर आकार)

प्रस्तावित दर
   ३ रुपये ३० पैसे
   ७ रुपये ३० पैसे
   ११० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant : लडाखमध्ये नवं न्यायालय सुरू; दुर्गम भागात न्याय मिळणं होणार सोपं, CJI सूर्यकांतांचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: ना होर्डिंग, ना डीजे, तरीही जयंती दणक्यात साजरी!; महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाने घालून दिला आदर्श

New Rules From April 1 India : देशात आजपासून अनेक कायदे आणि नियमांत बदल होणार, डिजीटल पेमेंटसाठी कडक सुरक्षा

Latest Marathi News Live Update : हवाई दलासाठी पर्वतीय रडारची खरेदी

आनंदाची बातमी! विद्यार्थिनींना मिळणार दोन हजार विद्यावेतन: चंद्रकांत पाटील यांची घोषणा, ‘कमवा आणि शिका’ उपक्रम

SCROLL FOR NEXT