Container Accident sakal
पुणे

Accident : शेवाळवाडी जवळ कंटेनरच्या अपघातात चालक ठार

शेवाळेवाडी जवळील रूकारी पेट्रोल पंपासमोर झालेल्या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला.

कृष्णकांत कोबल

हडपसर - शेवाळेवाडी जवळील रूकारी पेट्रोल पंपासमोर झालेल्या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने कंटेनरवर बांधलेले लोखंडी वस्तू केबिनवर आदळल्याने हा अपघात झाला. गुरुवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली. तुळशीराम गोविंद करे ( वय ४२ रा. नंदेश्वर, मंगळवेडा, सोलापूर ) असे मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास मालाने भरलेला कंटेनर पुण्याहून सोलापूरच्या दिशेला जात होता. शेवळवाडी येथील रूकारी पेट्रोल पंपासमोर कंटेनर समोर अचानक वाहन आल्याने चालकाकडून ब्रेक दाबण्यात आला. त्यामुळे वेगात असलेल्या कंटेनरवरील लोखंडी वस्तूला बांधलेला पट्टा तुटून या लोखंडी वस्तू पुढे असलेल्या चालकाच्या केबिनवर येऊन आदळल्या.

केबिनमध्ये केवळ चालक असल्याने चालकाच्या अंगावरून पुढे पंधरा फूट अंतरावरती लोखंडी वस्तू सरकून पडल्या. यामध्ये चालकाचा डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा मोठा होता की त्यामध्ये केबिनचा चक्काचूर झाला आहे. प्रवासी, स्थानिक नागरिक व पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करून चालकाला बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच चालकाचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.

दरम्यान, याप्रकरणी हडपसर पोलिसठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात झाल्यावर सोलापूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मृत तुळशीराम करे यांच्या पश्चात पत्नी व चार मुले असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT