road1.jpg 
पुणे

अरे बापरे ! पुणे- नगर रस्त्याचे काम अर्धवट सोडून कंत्राटदार गायब...

भरत पचंगे

शिक्रापूर (पुणे) ) : लॉकडाउनमुळे सुनसान झालेल्या पुणे- नगर रस्त्यावर फोन केबल व गॅस पाईप लाईन गाडण्यासाठी खड्डे खोदले गेले. मात्र ते न बुजविल्याने महामार्ग उखडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे व्यावसायिकांनाही मोठा फटका बसत असून कोणीच दखल घेत नसल्याने न्यायालयाकडे दाद मागण्याचा इशारा व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी अ‍ॅड. रावसाहेब करपे यांनी दिला. 

गेल्या काही दिवसांपासून महामार्गाला अगदी खेटून काही केबल टाकण्याचे काम सुरू आहे. गॅस पाईपलाईनचे काम सुरू असल्याने मजूर सांगतात. प्रत्यक्षात बीएसएनएलची केबल यातून टाकली जातेय, असे ठेकेदार सांगतोय. याबाबत अधिकारी म्हणून कोणीच कामावर येत नसल्याने शिक्रापुरातील व्यापारी हैराण आहे. अर्धवट खड्डे बुजविण्याच्या प्रकाराने अनेक दुकानांपुढे चिखल साठला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महामार्गाशेजारी असलेल्या करंजे मार्केटसमोर खड्डे खोदल्याने येथील बॅंक, हॉस्पिटल, कापड, हार्डवेअर आदींच्या ग्राहकांना आत जाणेच अशक्य झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी फोन उचलत नसल्याने व्यापारी आंदोलनाच्या तयारीत आहेत. दरम्यान, शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती करपे यांनी दिली. 

 

मागील वर्षी पाबळ चौकात आम्हाला पुढाकार घेऊन काम करावे लागले होते. यावर्षी नगर महामार्गावरच व्यापारी हैराण असल्याने आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बाबतीत आंदोलनाचा गंभीरपणे विचार करीत आहोत. 
अशोक शहाणे, अध्यक्ष, शिक्रापूर व्यापारी असोसिएशन 
 

बीएसएनएल आणि रिलायन्स गॅस कंपनीने आमच्याकडून खड्डे खोदण्याची परवानगी घेतलेली आहे. मात्र खड्डे बुजविण्याची अट त्यात आहे. कंत्राटदार व संबंधित कंपनीकडून खड्डे न बुजविणे, व्यापाऱ्यांना त्रास होईल असे वागण्याबाबत तक्रारी आल्या असून उद्या (सोमवारी) शिक्रापूर पोलिसांकडे संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल करून वरिष्ठांकडेही याबाबतचा अहवाल पाठविणार आहे. व्यापाऱ्यांना कुठलाच त्रास होणार नाही, याची दक्षता आम्ही घेत आहोत. 
नवनाथ शेळके, सहायक अभियंता, बांधकाम विभाग, पुणे- नगर महामार्ग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT