Army Sakal
पुणे

देशासाठी शहीद होणाऱ्या वीरांच्या पत्नींचे योगदान विसरण्यासारखे नाही.

‘प्रत्येक व्यक्ती आज देशात सुरक्षितपणे वावरत आहे. याचे श्रेय जाते ते देशाच्या सैनिकांना.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘देशाच्या सुरक्षेसाठी (Country Security) आपल्या सैनिकांचा (Army) सिंहाचा वाटा असतो. देशासाठी शहीद होणाऱ्या या वीरांच्या पत्नींचे योगदान ही विसरण्यासारखे नाही.’ असे प्रतिपादन महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला सशक्तीकरणावर आधारित व सैनिकी कुटुंबाला समर्पित करण्यासाठी लेखक व दिग्दर्शक पंकज सतीश साठे यांच्या ‘वाट तुझ्या पावलांची’ या गाण्याचे अनावरण मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी सोल्जर इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशनच्या सुमेधा चिथडे, वीरपत्नी शीतल जगदाळे , कुंदना आगवण, जयश्री शेळके, अजिता बागडे, सोनाली फराटे आदी उपस्थित होत्या. यावेळी सर्व वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला.

मोहोळ म्हणाले, ‘प्रत्येक व्यक्ती आज देशात सुरक्षितपणे वावरत आहे. याचे श्रेय जाते ते देशाच्या सैनिकांना. देशासाठी जबाबदारी पार पाडत असताना प्राणाचे बलिदान देणाऱ्या शहिदांच्या पत्नी देखील त्यांच्या मागे आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडतात. अर्धांगिनी म्हणून वेगळीच लढाई लढणाऱ्या वीरपत्नींची भूमिका या गाण्यातून पुढे आली आहे.’

चिथडे म्हणाल्या, ‘आजही कित्येक वीर पत्नींना संघर्ष करावा लागतो. जवान शहीद झाल्यावर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेणे हे समाज म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.’

देशासाठी केवळ सैनिकांचाच नाही तर त्यांच्या कुटुंबाचा ही त्याग असतो. याची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाने लक्षात ठेवावी आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी. यासाठीच हे गाणे शहीद झालेल्या प्रत्येक जवान बांधवाला अर्पण केले आहे. असे यावेळी साठे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT