Society 
पुणे

गृहनिर्माण संस्थांनी योगदान द्यावे - जिल्हाधिकारी

सकाळवृत्तसेवा

पुणे - सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष-सचिवांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून घोषित करण्यात येणार आहे. त्यांनी निवडणुकीशी संबंधित कामाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून लोकशाही सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

सहकारी गृहनिर्माण संस्थांचा निवडणूकविषयक कामात सहभाग घेण्याच्या दृष्टीने गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष-सचिवांची बैठक नुकतीच आयोजित केली होती. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड, पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राम म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत मतदारांची नाव नोंदणी, दुरुस्ती आणि वगळण्याची कार्यवाही सुरू आहे. गृहनिर्माण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार राहतात. त्यामुळे मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी तेथील गृहनिर्माण संस्थांचा अध्यक्ष किंवा सचिवांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक घोषित करण्यात येणार आहे. संस्थेतील नवीन मतदारांची नावनोंदणी तसेच संस्थेतील मृत, दुबार आणि स्थलांतरित मतदारांची नावे कमी करण्यासाठी या स्वयंसेवकांची मदत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संस्थांकडून आलेल्या यादीनुसार मतदार यादी अद्ययावत झाल्याबाबत दर आठवड्याला आढावा घेण्यात येणार आहे.

बैठकांचे आयोजन
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वाच्या भागात बैठका घेण्यात येणार आहेत. शहरात १६ हजार ३६० गृहनिर्माण संस्था असून, सहा उपनिबंधक कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या अखत्यारीतील मतदार याद्या अद्ययावत करणासाठी प्रयत्न केले जातील. गेल्या सात दिवसांत मतदारांचे १८ हजार अर्ज प्राप्त झाल्याचे मोनिका सिंह यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: पंतप्रधान आता नवीन स्वामी झालेत का? त्यांच्याकडे गद्दारांसाठी वेळ पण GenZ साठी नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Mumbai Local: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, प्रवाशांचा खोळंबा होणार; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन

Kolhapur House fire in Rui : डोळ्यादेखत घरं जळून खाक, हातात काहीच उरलं नाही; पण गावाच्या एका आवाहनाने लाखोंची मदत उभी राहिली

Latest Marathi News Live Update : पुण्यात आरक्षण उपवर्गीकरण विरोधात मोर्चा

Jharkhand Protest Reason : 38 प्रश्न सोडवले, तरी सरकारी नोकरी, झारखंडमधील स्कॅम काय?

SCROLL FOR NEXT