ncpbjp 
पुणे

बारामतीत भाजप- राष्ट्रवादीत श्रेय घेण्यासाठी चढाओढ 

सोमनाथ भिले

डोर्लेवाडी (पुणे) : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील गावठाण ते मेखळी जोड रस्ता या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ पहायला मिळाली. त्यातून या रस्त्याच्या कामाचे दोनदा स्वतंत्रपणे भूमिपूजन करण्यात आले.

डोर्लेवाडी ते प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 71 या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा परिषद निधीतून सन 2018- 19 मध्ये वीस लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे भूमिपूजन गुरुवारी (ता. 12) जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे, पंचायत समिती सदस्य राहुल झारगड,भारत गावडे सरपंच पांडुरंग सलवदे, अशोक नवले कांतिलाल नाळे, रमेश मोरे, भगवान क्षीरसागर, सुभाष नाळे, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

त्यानंतर सायंकाळी पाच वाजता याच रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भाजप- शिवसेनेच्या वतीने भाजप युवा मोर्चा अध्यक्ष युवराज तावरे, ज्येष्ठ नेते नाना सातव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ऍड. राजेंद्र काळे, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब शिंदे, ज्ञानेश्‍वर कौले, तालुकाप्रमुख विश्‍वास मांढरे, शहाजी दळवी, आनंदराव काळकुटे, भीमराव मदने, रणजित भोपळे, सचिन दळवी यांच्या हस्ते झाले. 

""जिल्हा परिषदेच्या 3054 ग्रामीण रस्ते विकास कार्यक्रमाअंतर्गत या रस्त्याच्या कामास सन 2018- 19 मध्ये मंजुरी मिळाली आहे. जिल्हा परिषदेत सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसची आहे. त्यामुळे निधी मंजुरीचे अधिकार सर्वस्वी जिल्हा परिषदेचे आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्षांनी तालुक्‍यातील इतर विकासकामांबरोबर येथील मंजूर असलेल्या कामाचे भूमिपूजन केले आहे. मात्र, राज्यातील सत्ताधारी नेहमीप्रमाणे जाहिरातबाजीसाठी त्यांनी निधी न दिलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे,'' असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संभाजी होळकर यांनी व्यक्त केले. 

भाजपचे युवराज तावरे म्हणाले, ""केंद्रात व राज्यात युतीचे सरकार आहे. त्यामुळे विकासकामांचा सर्व निधी सरकार देत असते. येथील रस्त्याच्या कामास पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी देखील 20 लाख रुपये व गावातील आणखी एका रस्त्याच्या कामास 8 लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे भूमिपूजन आम्ही केले आहे. या पुढेही गावात विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणणार आहे. विरोधकांनी विकासकामांत राजकारण आणू नये.'' 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT