PM Modi 
पुणे

Lokmanya Tilak Award: PM मोदींना टिळक पुरस्कार जाहीर झाल्यानं वाद! काँग्रेसकडून आक्षेप

या पुरस्कार सोहळ्यात शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. हा पुरस्कार मोदींना देण्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. याबाबत काँग्रेसच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे. (Controversy for Lokmanya Tilak Award to PM Modi Objection by Pune Congress)

काय आहे वाद?

टिळक स्मारक संस्थेकडून दिला जाणारा यंदाचा ४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणार आहे. पण टिळक स्मारक संस्थेच्यावतीनं हा पुरस्कार ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला ते रोहित टिळक हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींना पुरस्कार देण्यावरुन पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे. या आक्षेबाबतच पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवलं आहे.

कधी दिला जाणार पुरस्कार?

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यातिथीदिनी अर्थात १ ऑगस्ट रोजी दरवर्षी हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला जातो. यंदा देखील १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार पुण्यात देण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. शरद पवारांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाई, भलताच 'डेअरिंग'बाज निघाला... मॅच अर्ध्यावर सोडून लंडनसाठी पकडले विमान, १० खेळाडूंसह संघाला खेळावे लागले अन्...

SSC & HSC : गुणपत्रक, प्रमाणपत्र आता एकच; दहावी-बारावीबाबत राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

LSG vs DC Live: अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण झाले? रिषभ पंतने जाहीर केली प्लेइंग इलेव्हन, अक्षर पटेलने जिंकला टॉस अन्...

RTE Admission : ‘आरटीई’साठी २ लाख ८८ हजार अर्ज; ऑनलाइन सोडत, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे होणार जाहीर

तब्बल १२ वर्षांनी छोट्या पडद्यावर परत येतोय झी मराठीचा नायक; नावही तेच; प्रेक्षकांनी पाहताच ओळखलं

SCROLL FOR NEXT