अक्षता पवार sakal
पुणे

कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ५२ व्या तुकडीचा दिक्षान्त सोहळा उत्साहात संपन्न

नव्याने नियुक्त झालेल्या नर्सिंग अधिकाऱ्यांनी देखील स्वतःला समर्पित करत सेवा कार्य करावे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ५२ व्या तुकडीचा दिक्षान्त सोहळा मंगळवारी उत्साहात संपन्न झाला. कॅप्टन देवाशिष शर्मा परेड ग्राउंड येथे झालेल्या या कार्यक्रमात ३५ नर्सिंग पदवीधरांना मिलिटरी नर्सिंग सेवांमध्ये (एमएनएस) अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.

एएफएमसीच्या संचालक व प्रमुख लेफ्टनंट जनरल राजश्री रामसेथू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर वरिष्ठ अधिकारी, शिक्षक आणि पालकांनी ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रमात सहभाग घेतला.यावेळी लेफ्टनंट जनरल रामसेथू म्हणाल्या, ‘‘शांततेचे भाग, अवघड प्रदेश, बंडखोरीचे क्षेत्र, संयुक्त राष्ट्र उपक्रम अशा विविध भागांमध्ये असलेल्या लष्करी रुग्णालयांत सैन्य आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेत आहे. कोरोना काळात ही सशस्त्र दल वैद्यकीय सेवांमध्ये त्यांचे योगदान होते. नव्याने नियुक्त झालेल्या नर्सिंग अधिकाऱ्यांनी देखील स्वतःला समर्पित करत सेवा कार्य करावे.

तसेच संरक्षण सेवांसाठी एमएनएसच्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांसाठी प्राचार्य ब्रिगेडियर सुभाषिनी के आर आणि नर्सिंग कॉलेजच्या प्राध्यापकांचे कौतुक केले.

प्रशिक्षणादरम्यान उत्तरीर्ण कामगिरी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना यावेळी लेफ्टनंट जनरल रामसेथू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी लेफ्टनंट केशिया साजी हिला ‘लेफ्टनंट जनरल के एस मास्टर मेमोरिअल सिल्व्हर मेडल’ आणि ‘सिल्व्हर ज्युबिली रोलिंग ट्रॉफी’ प्रदान करण्यात आली. सर्वोत्कृष्ट अष्टपैलू नर्सिंग विद्यार्थी म्हणून ‘जनरल करिअप्पा रोलिंग ट्रॉफी’ लेफ्टनंट हरिथा ई के हिला प्राप्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT