MLS26B02492
माळशिरस : शहरात सहकार ज्योतीचे स्वागत करताना मान्यवर.
.....
सहकार ज्योतीचे माळशिरस येथे स्वागत
..........
माळशिरस : अकलूज येथून निघालेल्या कै. शंकरराव मोहिते-पाटील यांच्या ज्योतीचे व प्रतिमेचे माळशिरस शहरात स्वागत करण्यात आले.
कै. शंकरराव मोहिते पाटील यांची ज्योत व प्रतिमा सदाशिवनगर कारखाना येथे नेण्याची परंपरा अनेक वर्षांपासून असून शिवरत्न बंगला येथून निघालेल्या ज्योतीचे व प्रतिमेचे स्वागत माळशिरस येथील गणेश चौकात रामदास काळे, अमीर पठाण यांनी केले. त्यानंतर गोपाळराव देव प्रशालेजवळ कारखान्याचे व्हाइस चेअरमन मिलिंद कुलकर्णी, संचालक सुरेश पाटील, एम. पी. कुलकर्णी, रामभाऊ दोशी, संतोष कुलकर्णी, धोंडिराम मस्के यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले. त्यानंतर ज्योत सदाशिवनगरकडे मार्गस्थ झाली.