पिंपरी, ता. १४ : तांब्याच्या वायर चोरणाऱ्या टोळीला पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने जेरबंद केले. या कारवाईत नऊ गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींकडून १९ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जयराम विक्रम साळंके (रा. बोऱ्हाडेवाडी मोशी, मूळ- धाराशिव), सूरज जालिंदर फड (रा. जाधववाडी चिखली, मूळ- बीड), सचिन जालिंदर फड (रा. मोशी, मूळ- बीड), महोम्मद रियाज मोहम्मद बशीर सलमानी, मनोज चौधरी, अनुजकुमार रामक्रीपाल गौतम (तिघेही रा. कुदळवाडी, चिखली, मूळ- उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. हे आरोपी तांब्याच्या तारा चोरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या टोळीला ताब्यात घेत त्यांच्याकडून १८ लाख ७४ हजार रुपये किमतीचे तांबे, मोटार व टेम्पो जप्त केला. या तांब्याच्या तारेबाबत त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी तळेगाव एमआयडीसी आणि चिखली भागातील विविध ठिकाणच्या डी.पी. मधील तांब्याच्या वायर व केबल चोरी करून त्यातील काढलेल्या या तारा असल्याचे सांगितले. याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहा व चिखली पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
तसेच देहूरोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात अजय प्रल्हाद गायकवाड (रा. माधवनगर, चिखली) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता केबल वायर, दोन ग्राइंडर मशीन, दोन रेग्युलेटर व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण एक लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.