YCM-Pimpri-Chinchwad
YCM-Pimpri-Chinchwad 
पुणे

Coronavirus : मोठी बातमी : पिंपरी चिंचवडमधील आणखी पाच जणांना सोडणार घरी

सकाळवृत्तसेवा

'एनआयव्ही'कडील प्रथम अहवाल निगेटिव्ह; दुसराही निगेटीव्ह आल्यास होणार निर्णय
पिंपरी - कोरोना संसर्ग पाॅझिटीव्ह असलेल्या तिघांचे १४ दिवसांच्या उपचारानंतर एनआयव्हीकडील अहवाल निगेटिव्ह आलेत. त्यामुळे त्यांना शुक्रवारी (ता. २७) घरी सोडले. त्या पाठोपाठ आणखी पाच जणांचे प्रथम अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्यास त्यांनाही घरी सोडले जाणार आहे. त्यामुळे शहरातील १२ पैकी आठ जण बरे होऊन घरी पोचतील. शहरासाठी ही समाधानाची बाब असेल. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत एकही पाॅझिटीव्ह आढळलेले नाही. 

शहरात प्रथम आढळलेल्या तीन पाॅझिटीव्ह व्यक्तींवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील विलागीकरण कक्षात उपचार सुरू होते. त्यांना  घरी सोडण्यात आले आहे. त्यानंतर पाॅझिटीव्ह आढळलेल्या नऊ जणांवर भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील तिघांचा १४ दिवसांचा आयसोलेशन कालावधी पुर्ण झाला आहे.

त्यामुळे त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने गुरुवारी तपासण्यात आले. त्यांचा प्रथम अहवाल निगेटिव्ह आला आहे. २४ तासांच्या अंतराने पुन्हा नमुने घेऊन तपासण्यासाठी पाठविलेले आहेत. अद्याप त्यांचा अहवाल आलेला नाही. तोही निगेटिव्ह आल्यास तिघांना घरी सोडण्यात येणार आहे. अन्यथा पुन्हा १४ दिवस आयसोलेशन कक्षात उपचार केले जाणार आहेत.

दरम्यान, सर्वेलीयन पथकाद्वारे परदेशातून आलेले व होम क्वाॅरनटाईन केलेल्या व्यक्तींची तपासणी सुरू केली. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांच्या घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. पाॅझिटीव्ह आढळत नसले तरी महापालिका प्रशासनाने वायसीएम व भोसरीसह पिंपरीतील जिजामाता व नेत्र रुग्णालय सज्ज ठेवले आहेत. आठ खासगी रुग्णालयही सजले आहेत. 

गेल्या आठ दिवसांत तपासण्यात आलेल्या सर्वांचे अहवाल  निगेटीव्ह आलेले असले तरी, त्यांना, घरीच थांबा असे आदेश दिलेले आहेत.

दृष्टिक्षेपात
एकूण नमुने : २०१
निगेटिव्ह : १७७
पाॅझिटीव्ह : १२
बरे झालेले : ३
होम क्वारनटाइन : १३९४
तपासणी : ५,२२,७५३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT