corona 
पुणे

जेजुरीत आढळला कोरोनाचा रुग्ण 

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (पुणे) : कोरोनामुक्त पुरंदर तालुक्यामध्ये अखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जेजुरी शहरात सापडला. महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवस्थानच्या डायलेसिस सेंटरमधील २३ वर्षीय टेक्निशियन असलेल्या कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा झाल्याचे प्रशासनास मध्यरात्री समजले.

या रुग्णाला अन्यत्र हलविण्यात आले असून, आज शहर सील करत रुग्णाच्याजवळचे २० जण विलगीकरण कक्षात ठेवले. आणखी संसर्गाची शक्यता गृहीत धरून शहरभर तपासणी व सर्व्हेला विशेष पथके नेमली आहेत. 

याबाबत सासवडचे प्रांत प्रमोद गायकवाड व तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी माहिती दिली की, संबंधित रुग्ण जिथे काम करतो तेथील एक डॉक्टर पुण्याहून येतात. त्यांनी काळजी म्हणून डायलेसिस सेंटरमधील एक रुग्ण व या कर्मचाऱ्याची रॅन्डमली तपासणी केली. त्यात हा देवस्थान कर्मचारी बाधीत सापडला. हा पुरंदर तालुक्याला व जेजुरी शहराला धक्का ठरला आहे. या रुग्णाच्या थेट संपर्कातील २० जण क्वारंटाइन केले आहेत. रुग्ण जेजुरीभोवती खुप फिरला आहे. त्याच्या संपर्कातील व लक्षणे असणारांनाही प्रसंगी क्वारंटाइन केले जाईल. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

जेजुरी तालुक्यात विविध भागातील अगोदर वेगवेगळे आढळलेल्या १८ जणांचे रिपोर्ट पूर्वीच निगेटिव्ह आले आहेत. तोंडल (ता. पुरंदर) येथील तब्बल २१ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनामुक्त पुरंदरची डोकेदुखी वाढली होती. त्यांचे पहिले रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. मात्र, पुढेही दुसरी तपासणी होईपर्यंत सर्वांचा क्वारंटाइन मुक्काम सासवडला कोविड केअर सेंटरला राहिला आहे. आता जेजुरीची चिंता पुरंदरला सतावणार आहे. जेजुरी पुरती रेड झोनमध्ये गेल्याचे जणू चित्र आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT