Corona Patient 
पुणे

कोरोना रुग्ण वाढीचा धोका; कोविड केअर सेंटरच्या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती

सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागल्याने, कोविड केअर सेंटर आणि समर्पित कोविड रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर काम करत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने पुनर्नियुक्ती दिली आहे. पूर्वनियोजनानुसार हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी ३१ मार्चपर्यंत नियुक्त करण्यात आले होते. या पुनर्नियुक्तीमुळे या सर्वांना आणखी तीन महिने मुदतवाढ मिळाली आहे. मार्चअखेरपर्यंत 25 टक्के मनुष्यबळ ठेवण्याची सूचना राज्य सरकारने केली होती. परंतु वाढती रुग्णसंख्या पाहता, सर्वांना पुन्हा तीन महिन्यांकरिता पुनर्नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना तसा आदेश दिला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामुळे पुन्हा एकदा कोविड केअर सेंटरसह अन्य सर्व आरोग्य संस्था पुन्हा नव्या जोमाने कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी सज्ज होणार आहेत. या नव्या आदेशामुळे सर्वांना आता येत्या ३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार नवीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्त करता येणार नाही. शिवाय वारंवार गैरहजर राहणारे आणि रुग्णांवरील उपचारांबाबत हलगर्जीपणा करत असलेल्या तक्रारी प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्त्या न देण्याचा आदेशही आयुष प्रसाद यांनी दिला आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dam Water Level Rises : खडकवासला धरण वेगाने भरतंय... पुढचे काही तास ठरणार निर्णायक? प्रशासनाने नागरिकांना दिला महत्त्वाचा इशारा

मोठी बातमी! माध्यमिक शाळांमध्ये आता कला-क्रीडा-संगीत शिक्षकांची भरती; राज्यात यंदा १८ हजार शिक्षकांची भरती; रिक्त पदे अपलोड करायला १० जुलैपर्यंत मुदत

उजनीत ८१ हजार क्युसेकची आवक! पुण्यातील पश्चिम घाटमाथ्यावर दमदार पाऊस, 3 दिवसांत ‘प्लस’मध्ये येण्याची शक्यता; गतवर्षी धरण 27 मे रोजी प्लसमध्ये, वाचा....

Daliya Laddu Recipe:फायबरने भरपूर अन् पचायला हलके , १५ मिनिटांत तयार करा पौष्टिक दलियाचे लाडू

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

SCROLL FOR NEXT