lockdown 
पुणे

'तर पुन्हा उभारी घेणं महामुश्‍कील'; लॉकडाऊनबाबत पुण्यातील लघु उद्योजकांमध्ये भीती

सकाळवृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील औद्योगिक स्थिती समजावून घेण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) वतीने गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेनुसार विविध प्रकारचे उद्योजक त्यांच्या 85 टक्के उत्पादन क्षमतेपर्यंत पोचले आहे. मात्र जर पुन्हा लॉकडाऊन झाला उद्योगाची साखळी बिघडेल व त्यातून पुन्हा उभारी घेणं महामुश्‍कील होईल, अशी भीती लघु उद्योजकांना आहे. इतर उद्योगांची देखील अशीच स्थिती आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे संचारबंदीचे नियम कडक करण्यात आले आहे. तर लॉकडाऊन देखील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास व्यावसायिक उद्ध्वस्त होऊन अनेकांचे रोजगार जातील, अशी भीती व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. याबाबत पिंपरी-चिंचवड लघू उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले की, जानेवारीपासून क्षेत्राची स्थिती सुधारत आहे. मात्र काही उद्योग अद्याप सुरू झाले नाहीत.

अनेकांचे कर्ज घेऊन कामकाज सुरू आहे. त्यामुळे लॉकडाऊन झाल्यास स्थिती आणखी बिकट होईल. उद्योजकांबरोबर कामगारांना देखील त्रास होईल व व्यवसायाची सर्व साखळी बिघडेल. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास २० ते २५ टक्के व्यवसाय सुरूच होणार नाहीत. या सर्वांचा विचार करता सरकारने लसीकरण वाढवावे. औद्योगिक क्षेत्रात आवश्‍यक ती सर्व मदत आम्ही करू. कामगारांच्या लसीचे पैसे देण्यास आम्ही तयार आहोत. पिंपरी-चिंचवडमध्ये ११ हजार ५०० सुक्ष्म, लघू व मध्यम तर ५०० मोठे व्यावसायिक आहेत. त्यातील ९० टक्के उद्योग सुरू झाले आहे.

व्यवसायिकांचे उत्पादन सुरू आहे. मात्र मालाची मागणी अद्याप कमीच आहे. कोरोना पूर्वीचे उत्पादन व मागणीचा विचार केला असता. सध्या केवळ सुमारे ६० टक्के मागणी आहे. लॉकडाऊन झाल्यास ही सर्व स्थिती बदलेन. त्यामुळे लॉकडाऊन हा आता पर्याय नाही. कामगार आणि उद्योजक दोघांना त्यातून मोठे झटका बसेल.
- मानवेंद्र कुलकर्णी, अध्यक्ष, पर्वती औद्योगिक वसाहत लिमिटेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT