Bailpola Sakal
पुणे

बैलपोळासणावर कोरोनाचे सावट

भाद्रपदी बैलपोळा अवघ्या एक दिवसावर आला आहे परंतु मागील दोन वर्षापासून कोरोनो संसर्गाचे सावट बैलपोळ्यावर आहे.

सुदाम बिडकर

पारगाव - भाद्रपदी बैलपोळा अवघ्या एक दिवसावर आला आहे परंतु मागील दोन वर्षापासून कोरोनो संसर्गाचे सावट बैलपोळ्यावर आहे. आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील गावोगावच्या कुंभारवाड्यात बैलपोळ्याला पुजेचा मान असलेल्या मातीचे बैल बनविण्याच्या काम अंतीम टप्प्यात असले तरी आठवडे बाजार बंद असल्याने मातीच्या बैलांच्या मागणीत निम्म्याने घट झाली आहे.

शेतीसाठी बैलांएैवजी ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने शेतकर्यांच्या घरासमोर दिसणार्या बैलजोड्या दिसेनास्या झाल्या आहेत. बैलपोळा एक महीन्यावर आल्यावर बैलपोळ्याला पुजेसाठी वापरण्यात येणारे मातीचे बैल बनविण्याच्या कामाला गावोगावच्या कुंभारवाड्यामध्ये वेग येत असतो. धामणी येथील गणेश रोकडे हे मातीचे बैल बनवून त्यांना आकर्षक रंगकाम करतात त्यांनी बनवलेल्या बैलांना ग्रामिण भागाबरोबर शहरी भागातुनही मागणी असते.

बैलजोडीच्या किमती आकारानुसार 20 रुपयांपासुन दोन हजार रुपये कीमती पर्यंत असतात श्री. रोकडे यांनी बनविलेले मातीचे आकर्षक बैलांच्या प्रतीकृतींना आसपासच्या गावांतील आठवडे बाजाराबरोबर पुणे, ठाणे व मुंबई शहरात विक्री करता पाठवत असतात भाद्रपदी बैलपोळा अवघ्या एक दिवसावर आला आहे. कोरोनो संसर्गाचे सावट बैलपोळा सणावर आहे बैलपोळ्यांच्या मिरवणुकांवर बंदी आहे त्यातच गावोगावचे आठवडे बाजार बंद आहेत. त्यामुळे या कारगीरांनी बनविलेल्या मातीच्या बैलांच्या मागणीत निम्म्याने घट झाली असल्याचे गणेश रोकडे यांनी सांगीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

Hatkanangale Railway Accident : हेडफोन घालून मोबाईलवर बोलत निघालेल्या 17 वर्षीय युवतीचा रेल्वेखाली करुण अंत; डॉ. आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावर धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT