पुणे

कोरोनामुक्तांनो, फुफ्फुस सांभाळा! 

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनामुक्त रुग्णांनो, आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता नियमित तपासणे गरजेचे आहे. विशेषतः अतिदक्षता विभागात उपचार घेतलेल्या तसेच ऑक्‍सिजनची गरज पडलेल्या रुग्णांनी यात सातत्य ठेवणे आवश्‍यक आहे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. 

हवेतील ऑक्‍सिजन शोषून तो शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोचविण्याची क्षमता कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कमी होते. त्यामुळे सद्यःस्थितीत फुफ्फुसाची क्षमता किती आणि त्या आधारावर पुढील वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी कोरोनामुक्त रुग्णांनी डॉक्‍टरांकडे पाठपुरावा करणे गरजेचे असते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फुफ्फुसांवर होणारा दुष्परिणाम 
-कोरोनाचा विषाणू श्‍वसन मार्गातून शरीरात प्रवेश करतो 
-काहींना संसर्ग होतो; पण तो त्यांच्या न कळत बराही होतो 
-त्याला वैद्यकीय परिभाषेत "असिंमटेमेटिक' म्हटले जाते 
-वीस टक्के रुग्णांमध्ये संसर्गाचा प्रादुर्भाव थेट फुफ्फुसांपर्यंत पोचतो 
-त्यातून न्यूमोनिया होतो 
-दोन्ही फुफ्फुसांवर एकाच वेळी हा विषाणू हल्ला करतो 
- त्यामुळे रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होण्याची शक्‍यता वाढते 

"पोस्ट कोविड' गुंतागुंत 
कोरोनाबाधिताला 17 दिवस उपचार दिल्यानंतर फुफ्फुसावर विषाणूंच्या सुरू असलेल्या दुष्परिणामाला पोस्ट कोविड म्हटले जाते. कोरोना झालेल्या रुग्णांना अनेकदा व्हेंटिलेटर ठेवावे लागते. त्यातून रुग्ण बरा होतो. रक्तातील ऑक्‍सिजनची पातळीही स्थिर असते; पण त्यानंतर फुफ्फुसाचे कार्य पूर्णतः सुधारलेले नसते. अशा रुग्णांना घरीदेखील काही प्रमाणात ऑक्‍सिजन देण्याचा सल्ला दिला जातो. कारण रुग्णाच्या फुफ्फुसांना कोरोनामुळे इजा झालेली असते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

1. लंग फ्रायब्रोसिस 
कोरोनामुळे फुफ्फुसाला होणारी इजा सहा-सहा महिने सुरू असल्याचे सध्या दिसत आहे. त्याला वैद्यकीय परिभाषेत लंग फ्रायब्रोसिस म्हणतात. कोरोना संसर्गामुळे फुफ्फुसात तंतू तयार होतात. त्यामुळे ऑक्‍सिजन शोषून घेण्याचे फुफ्फुसाचे कार्य मंदावते. अशा रुग्णांनी सातत्याने फुफ्फुसाचे कार्य तपासण्याची गरज आहे. 

2. ऑर्गनायजिंग न्यूमोनिया 
कोरोनामुक्त रुग्णांत काही दिवस थकवा असतो. त्याला दम लागतो. खोकला येतो. अशा रुग्णांमध्ये कोरोनामुळे झालेला न्यूमोनिया पूर्ण गेलेला नसतो. तिथे त्याचा काही अंश शिल्लक असतो. न्यूमोनिया पूर्णतः बरा होण्यासाठी किमान तीन आठवडे लागतात; पण काही रुग्णांमध्ये यापेक्षा जास्त दिवस होऊनही न्यूमोनिया दिसतो. याला सेकंडरी ऑर्गनायजिंग न्यूमोनिया म्हणतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

3. सेकंडरी इन्फेक्‍शन 
या प्रकारात सेकंड्री इन्फेक्‍शन नसते; पण विषाणूंच्या संसर्गाच्या ठळक खुणा दिसत असतात. अशा रुग्णांना स्टेरॉईड द्यावे लागते. 

4. क्रॉनिक ब्रॉंकायोटिस 
कोरोनामुक्त रुग्णांमध्ये या तीनही प्रकारची गुंतागुंत नसते. त्यामुळे शरीरात ऑक्‍सिजन शोषून घेण्याच्या फुफ्फुसाच्या क्षमतेवर याचा परिणाम झालेला असतो. अशा रुग्णांना "इन्हेलर' घेण्याचा सल्ला दिला जातो. त्याला क्रॉनिक ब्रॉंकायोटिस असे म्हटले जाते. 

उच्च रक्तदाब, लठ्ठपणा असलेल्या रुग्णांमध्ये प्रतिकार शक्ती कमी झालेली असते. अशा रुग्णांना याचा संसर्ग होण्याची शक्‍यता जास्त असते. तसेच त्यातून इतर रोगजंतूंचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. अशा रुग्णांनी फुफ्फुसाची नियमित तपासणी करण्याची गरज आहे. 
-डॉ. अश्‍विनी जोशी, वैद्यकीय तज्ज्ञ, आलोहा क्‍लिनिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: आदल्या दिवशी वाद; नंतर तलवार घेऊन तरुण हॉटेलमध्ये घुसला अन्... नवी मुंबईत मॅनेजरसोबत काय घडलं?

Pune Bangalore Highway Accident : देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला! पुणे–बंगळूर महामार्गालगत पिकअप पलटी; 11 भाविक जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

ग्लेन फिलिप्स फक्त मैदानातच उडत नाही, तर आकाशात विमानही उडवतो; स्वत:च शेअर केला Video

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

SCROLL FOR NEXT