corona virus 
पुणे

पुण्यात कोरोनाचा कहर! दिवसभरात ५,७२० नव्या रुग्णांची उच्चांकी नोंद

सकाळ डिजिटल टीम

पुणे शहरात आज कोरोनाच्या संसर्गानं नवा उच्चांक गाठला. गेल्या चोवीस तासात शहरात ५,७२० नवे रुग्ण आढळून आले. पुणे शहरात पहिल्यांदाच आजवर दिवसभरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ९ रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

पुणे : अंशतः लॉकडाऊन, पोलिसांकडून नाकेबंदी; रस्त्यांवर वाहनांच्या रांगा! 

आरोग्यविभागाच्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात ५,७२० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात ३,२९३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर ४४ रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यात दिवसभरात ४४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, यामध्ये ९ रूग्ण हे पुण्याबाहेरील आहेत.

पुन्हा लॉकडाउनचे दिवस, फ्रान्सनंतर बांगलादेशात निर्बंध; भारतातही निर्णयाची शक्यता?

दरम्यान, पुण्यात सध्या ८३७ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजच्या वाढलेल्या संख्येनंतर शहरातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २,८३,८१९ पोहोचली आहे. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३९,५१८ आहे. आजवर शहरात ५,४११ इतक्या बाधित रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. 

आजपर्यंत २,३८,८९० रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचबरोबर दिवसभरात २०,०६६ नमुन्यांची तपासणी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT