पुणे

पुणे : रहाटवडे गावातील वृद्धाला कोरोनाची लागण

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : रहाटवडे (ता.हवेली) या गावातील एका 80 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. इतके दिवस सुरक्षित असलेल्या पश्चिम हवेलीत पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने येथील नागरिकांची चिंता वाढली आहे. या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या थेट संपर्कात आलेल्यांचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले आहेत, अशी माहिती हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर कोरोनाबाधित व्यक्तीचे वय 80 वर्षे आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला. सदर कोरोनाबाधित व्यक्ती बाहेर ये-जा करत नव्हती. मात्र, सदर व्यक्तीचा मुलगा नोकरीनिमित्त पुण्यात ये-जा करत होता. त्यामुळे कोरोनाची लागण नेमकी कशी झाली याचा शोध सुरू आहे. सदर व्यक्ती हा पश्चिम हवेली पट्ट्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे. इतके दिवस सुरक्षित असलेल्या या भागात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याने येथील नागरिकांची चिंता वाढली आहे.

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

याबाबत हवेलीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात म्हणाले, "खासगी दवाखान्यात सदर व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्या व्यक्तीच्या घरातील व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तर इतर संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT